Eknath Shinde – राज्यात अनेकठिकाणी पूरस्थिती आहे. याचे दौरे आम्ही सर्वांनी केले. अनेक ठिकाणी भेटी दिल्या. हे शेतकऱ्याच संकट खूप मोठं आहे. बोलताना त्याच्या वेदना जाणवत होत्या. त्यांच्या मागे सरकार खंबीरपणे उभं राहील आहे. आज देखील बैठकीत याची चर्चा झाली, मदत देताना सरकार हात आखडता घेणार नाही. 60 लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झालं आहे. पंचनामे सुरू आहेत. काम सुरू आहे. सर्व अटी, शर्ती, नियम बाजूला ठेऊन त्यांना मदत केली जाणार आहे. दौरा करून आल्यावर आम्ही सर्व बसून ठोस निर्णय घेऊ. यापूर्वी देखील सरकारने अशा प्रकारचा निर्णय घेतला होता. असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितेल. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली
नदी प्रवाहात शेत जमीन वाहून गेली. आता पाऊस थांबला असला तरी नदीच्या प्रवाहामुळे अद्यापही काही घरे पाण्यात आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आम्ही दिवेदन दिले आहे. मोदींना पत्र दिले आहे. मोदी शेतकऱ्यांच्या पाठी उभे राहिले आहे. राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागे उभे राहील. त्यांना मदत करणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. आम्ही प्रत्यक्ष बांधावर जाऊन त्यांच्या घराची, शेताची, पशुधनाची केली. गहू तांदूळ देण्याची सुरुवात झाली आहे. मोठ्या प्रमाणात त्यांना मदतीची आवश्यकता आहे.

आम्ही मागील आठवड्यापासून साहित्य पाठवण्यास सुरुवात केली आहे. साथीचे आजार पसरू नयेत म्हणून स्वच्छता झाली पाहिजे. त्यासाठी यंत्रणा लावली पाहिजे. मी त्यासाठी आरोग्य मंत्र्यांशी बोललो, मेडिकल कॅम्प, खासगी दवाखाने, मेडिकल किट पुरवले जात आहेत. असं शिंदे म्हणाले.
बँकांवर कारवाई करणार
कोल्हापुरात असा पूर आला होता. त्यावेळी आम्ही जी काळजी घेतली, तीच काळजी आता घेतली जाणार आहे. जिथे आपत्ती तिथे शिवसेना, जिथे संकट तिथे शिवसेना हे आमच धोरण. बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या धोरणानुसार आम्ही काम करतोय. त्या भागातील कार्यकर्त्यांना दसरा मेळाव्याला इकडे न बोलावता शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांच्या घरी जाऊन मदतीचे काम करा अशा सुचना मी केल्या आहेत. त्याचे अश्रू पुसण्याची आता आवश्यकता आहे. त्यांचा दसरा दिवाळी काळी होऊ नये, यासाठी त्यांना जी मदत लागेल त्या मदतीसाठी आम्ही कार्यकर्त्यांना पाठवत आहोत. असं आश्वासन शिंदेंनी दिले. तसेच कोणत्याही बँकेने कर्ज वसुलीसाठी नोटीस पाठवली तर त्यांच्यावर कारवाई करणार.
मदतीचे तोरण हेच शिवसेनेचे धोरण
मुंबई ठाण्यातील MMR भागातील लोकं दसरा मेळाव्याला येतील. 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण आहे. संकट काळात आम्ही आमचे कर्तव्य बजावणार. मदतीचे तोरण हेच शिवसेनेचे धोरण असल्याचे शिंद म्हणाले. आम्ही दसरा मेळावा नेस्को मध्ये घेऊ, त्यांनी फोटोचे राजकारण केले. याआधी आम्हीच तुमचे फोटो लावले होते. कार्यकर्ते तेव्हा काम करत होते. त्यांचा संसार आम्हाला उभा करायचा आहे. बाळासाहेब म्हणायचे कार्यकर्ता लोकांच्या घराघरात चांगला दिसतो. शक्ती प्रदर्शन करण्याची गरज आम्हाला नाही. आमची शक्ती जगाला दिसली आहे. ही शक्ती आम्ही लोकांच्या मदतीसाठी आम्ही वापरणार असल्याचे शिंदे म्हणालेत.











