MP Breaking News
Thu, Dec 18, 2025

“गाडी उताराला लागलीय”! मंत्री शिरसाट-माधुरी मिसाळांच्या लेटर बॉम्बवरुन संजय राऊतांची खोचक टिका, म्हणाले…

Written by:Astha Sutar
Published:
Last Updated:
मंत्र्यांना दिलेले उत्तर बोलके आणि गुर्मी उतरवणारे आहे! वरचा पूर्ण पाठिंबा असल्याशिवाय इतके कडक उत्तर कोणी देणार नाही. मंत्री संजय शिरसाट आणि खासदार संजय राऊत यांच्यात कलगीतुरा रंगला असताना, आता आज पुन्हा एकदा संजय राऊतांनी संजय शिरसाटांवर पोस्ट करत खोचक टीका केलीय.
“गाडी उताराला लागलीय”! मंत्री शिरसाट-माधुरी मिसाळांच्या लेटर बॉम्बवरुन संजय राऊतांची खोचक टिका, म्हणाले…

Sanjay Raut – महायुतीतील नेते अनेक वादग्रस्त वक्त्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. तसेच त्यांच्यावर घोटाळे, भ्रष्टाचाराचेही आरोप होत असताना, आता दुसरीकडेच महायुतीत समन्वय नसल्याचे, आलबेल नसल्याचे चित्र दिसून येत आहे. कारण सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आपणाला माहिती न देता परस्पर बैठका घेतल्या म्हणून त्यांना पत्र पाठवत उघडपणे नाराजी व्यक्त केली.

यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला. तर आज पुन्हा एकदा खा. संजय राऊतांनी पोस्ट करत संजय शिरसाट यांची गाडी उतरायला लागली आहे, अशी खोचक टीका केली आहे.

गाशा गुंडाळावा लागेल…

दोन दिवसांपूर्वी माधुरी मिसाळांनी बैठक घेतल्यानंतर मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त करताना पत्र पाठवलं होतं. या पत्राला माधुरी मिसाळांनी उत्तर देत बैठक घेण्यासाठी मंत्र्यांची परवानगीची आवश्यकता नाही. असं म्हणत जशास तसे उत्तर दिले आहे. हेच पत्र संजय राऊत यांनी पोस्ट करत वरिष्ठांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या परवानगीविना माधुरी मिसाळ या बैठका घेऊ शकणार नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री हे संजय शिरसाट यांच्यावर नाराज असून, त्यांना लवकरच गाशा गुंडाळावा लागेल, असं मोठं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलं होतं. यानंतर आज पुन्हा एकदा संजय राऊतांनी संजय शिरसाटांवर पोस्ट करत खोचक टीका केलीय.

उत्तर बोलके आणि गुर्मी उतरवणारे…

मंत्री संजय शिरसाट आणि खासदार संजय राऊत यांच्यात कलगीतुरा रंगला असताना, आता आज पुन्हा एकदा संजय राऊतांनी संजय शिरसाटांवर पोस्ट करत खोचक टीका केलीय. “सामाजिक न्याय खात्याच्या राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ यांनी त्यांच्या पूर्ण मंत्र्यांना दिलेले उत्तर बोलके आणि गुर्मी उतरवणारे आहे! वरचा पूर्ण पाठिंबा असल्याशिवाय इतके कडक उत्तर कोणी देणार नाही! गाडी उताराला लागलीय”, असं पोस्टमध्ये संजय राऊतांनी म्हटले आहे.