Uddhav Thackeray – आमचे आंदोलन हे निवडणूक आयोगाविरोधात आहे, आज दोन ठिकाणी आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करण्यात आले. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीचे दिल्लीत आंदोलन झाले. पण सरकार आणि भाजपा यामध्ये का येतात हे माहिती नाही. कारण त्यांनी मतांची चोरी केलीय म्हणून ते मधे-मधे येताहेत. सर्वोच्य न्यायालयापेक्षाही निवडणूक आयोग मोठे झाले आहे का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित करत निवडणूक आयोग, भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
नेमकी कोणती ओळख दाखवायची?…
सहा महिन्यात जवळपास 45 लाख मतं कशी वाढली, याचा जाब विचारण्यासाठी दिल्लीत इंडिया आघाडीने आंदोलन केले. परंतू हे आंदोलन दडपण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आता लोकं निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावर आहेत. त्यामुळं आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेतलंय हे पाहयचे आहे. तुमची ओळख पटवून द्या असं निवडणूक आयोग म्हणतंय. त्यामुळं आता नेमकी कोणती ओळख दाखवायची?आता व्हीव्हीपॅट देखील काढले जात आहे. आमची मागणी आहे की, बॅलटे पेपरवर निवडणुका घ्या आणि ईव्हीएम मशीन बंद करा, असं ठाकरे म्हणाले.
निवडणूक आयोग न्यायालयापेक्षा मोठे?
पुढे बोलतना उद्धव ठाकरे म्हणाले की, भ्रष्टाचाराचे राज्यपालांना सर्व पुरावे दिले आहे, तरी सुद्धा राज्यपाल काही करत नाहीत. जगात सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताकडे पाहिले जाते. पण आज लोकशाहीचा बळी किंवा लोकशाहीची हत्या होत आहे, हे सर्व जगाने पाहिले आहे. दिल्लीत इंडिया आघाडीचे निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा आणि आंदोलन झाले आहे. ही लढाई निवडणूक आयोगाविरोधात आहे. सर्वोच्य न्यायालयापेक्षा निवडणूक आयोग मोठे आहे का? देशाच्या लोकशाहीला सरकारने काळिमा फासलं आहे. अशी टिका उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर केली.
प्रेझेन्टेश पंतप्रधानांनी समजून घ्यावे…
आम्हांला आमच्या कर्तृत्वावर विश्वास आहे. आमची भाजपासोबत युती होती, तेव्हा ईव्हीएम कसे हॅक केले जाते याचे प्रात्यक्षिक दाखवले गेले होते. दिल्लीत राहुल गांधींनी जे प्रेझेन्टेश दिले, ते पंतप्रधानांनी समजून घेतलं पाहिजे, असा टोला उद्धव ठाकरेंनी मोदींना लगावला. लोकसभेला देखील मतांची चोरी झाली, यानंतर विधानसभा निवडणुकीत सांयकाळी 5 नंतर अचानक मतांची टक्केवारी वाढली.





