Naresh Mhaske – एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. दोघांमध्ये विस्तवही जात नाही. काही दिवसांपूर्वी गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंवर टिका केली होती. तसेच नवी मुंबईत युती झाली काय किंवा नाही झाली काय, शेवटी भाजपाचाच महापौर होणार असल्याचे मोठे वक्तव्य गणेश नाईकांनी केले होते. यानंतर नाईकांचा समाचार शिवसेनेनं घेतला आहे. दरम्यान, आमच्या नेत्यांना गणेश नाईक तुम्ही नालायक म्हणत आहात. मात्र नालायकपणाची एक व्याख्या असते. तुमच्या नालायकपणाचे व्हिडीओ नवी मुंबईच्या गल्लीत पूर्वी फिरत होते.
नंतर ते व्हिडीओ फेसबुक आणि व्हाट्सअपच्या माध्यमातून महाराष्ट्रात गाजले. भविष्यात हेच व्हिडीओ संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात प्रदर्शित केले जातील, असा कडक शब्दात खा, नरेश म्हस्के यांनी गणेश नाईक यांना इशारा दिला आहे. आजा त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

त्याच भाषेत शिवसैनिक उत्तर देतील
दरम्यान, नवी मुंबईचे राजे म्हणवणाऱ्या गणेश नाईक यांची यामुळे जळफळाट होत असून, शिंदे साहेबांविरोधात ते रोज बेताल वक्तव्ये करीत आहेत. यापुढे जर अशी वक्तव्ये केली तर त्याच भाषेत सर्वसामान्य शिवसैनिक उत्तर देतील, असा इशारा शिवसेना प्रवक्ते खासदार नरेश म्हस्के यांनी दिला आहे. नवी मुंबईतील भूमिपुत्र, माथाडी कामगार आणि झोपडट्टीधारकांना मोफत घरे मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढीव एफएसआय, नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट झालेल्या १४ गावांसाठी ७० कोटींचा निधी शासन देणार आहे. अवघ्या काही वर्षातच नवी मुंबईकरांच्या दारात विकासाची गंगा शिंदे साहेबांनी आणली आहे. त्याचा राग गणेश नाईकांना आहे.
नाईक शिंदेंच्या विरोधात बेताल वक्तव्ये करताहेत
नवी मुंबई मध्ये घराणेशाही लादणाऱ्या गणेश नाईक यांनी नवी मुंबईकरांना गेली अनेक वर्ष नागरी सुविधांपासून वंचित ठेवले आहे. सत्तेत असूनही नागरिकांचे कोणतेच प्रश्न मार्गी लावलेले नाहीत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नवी मुंबईकरांनी गाऱ्हाणे घातले. त्याला एकनाथ शिंदे यांनी यांनी प्रतिसाद दिला. राज्यात महायुतीचे सरकार आहे. तरीही सातत्याने गणेश नाईक हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बेताल वक्तव्ये करत आहेत. दिशाभूल करणारी माहिती पसरवत आहेत. आज खासदार नरेश म्हस्के यांनी माध्यमांशी सवांद साधताना कडक शब्दात गणेश नाईक यांना अंतिम इशारा दिला आहे.
नाईक २ महिने फरार होते
दुसरीकडे गणेश नाईकांनी केलेले कारनामे नवी मुंबई नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. त्यांचे रील्स, फोटो, व्हिडिओ दाखवायला गेलो तर तीन तास पण कमी पडतील. जर शिंदे साहेबांबद्दल असे वाईट पुन्हा बोलत गेले तर संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात गणेश नाईकांचे कारनामे जनतेला दाखवू असा इशाराही किशोर पाटकर यांनी दिला आहे. तसेच शिंदे साहेब प्रत्येकाच्या मनामनामध्ये आहेत. चांगला माणूस म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते. गणेश नाईक यांच्यावर घाणेरडे गुन्हे दाखल झाले होते. दोन महिने ते फरार होते. अशी व्यक्ती शिंदे साहेबांना नालायक म्हणते.











