मुंबई – मराठी आणि मराठी वाद मुंबई पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. 2008 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय विरोधात आवाज उठवला होता. मुंबई आणि महाराष्ट्रात भूमिपुत्रांना नोकरी मिळाली पाहिजे. यासाठी त्यांनी आंदोलन करत उत्तर भारतीयांना चोप दिला होता. यानंतर पुन्हा एकदा मराठीच्या मुद्दावरुन मनसे आक्रमक झाली असताना, मनसे नेते संदीप देशपांडेंना धमकीचा फोन कॉल आला आहे.
ठाकरेंच्या आदेशानंतर कार्यकर्ते आक्रमक…
दरम्यान, गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषा मुंबईसह राज्यात टिकली पाहिजे. यासाठी सर्व आस्थापन, बँका, कंपनीमध्ये मराठी भाषा बोलली जाते की नाही. मराठीमध्ये व्यवहार होतात की नाही. याकडे लक्ष द्या, असे आदेश राज ठाकरे यांनी दिले होते. मुंबईत राहयचे असेल तर मराठी बोलता आलं पाहिजे, यासाठी राज ठाकरेंनी आग्रह धरला आहे. यानंतर मनसैनिकांनी आंदोलन करत अनेक बँकांमध्ये प्रत्यक्ष जाऊन तिथे मराठी भाषा बोलली जाते की नाही…, लिहिली जाते की नाही, याची पडताळणी करत आहे. तसेच मराठीसाठी तुम्ही शिकवणी लावा. असा समज उत्तर भारतीयांना दिला आहे. यानंतर पुन्हा एकदा मराठी अमराठीचा मुद्दा उफाळून आला आहे. यानंतर आज आता मनसे नेते आणि मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांना धमकीचा फोन आला आहे.

धमकीच्या संभाषणात काय?
देशपांडेंना फोन करणार व्यकींनी तुम्ही मराठीचा आग्रह कशा करिता धरता. यानंतर दोघांमध्ये वाद झाला. धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीने फोनवरून शिवीगाळ केल्यानंतर संदीप देशपांडे यांनीही त्या व्यक्तीला शिव्या दिल्या. मी तुला भेटायला कुठे येऊ…, तू कुठेही भेटायला ये…, तू माझे काही करू शकत नाहीस भैय्या…. असे संदीप देशपांडे म्हणाले. यानंतर ठीक आहे. मी भेटायला तुला येतो. कुठे सांग येऊ… असे फोन करणार व्यक्तींने म्हटले. यानंतर तुझी १ सीट निवडून येत नाही. असं धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीने म्हटले. या धमकीच्या फोननंतर संदीप देशपांडे यांनी दादर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार दिली असून, गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहे.











