आज मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री शेतीच्या बांधावर, कोण कोणत्या जिल्ह्यात दुष्काळाची पाहणी करणार?

Astha Sutar

State government – महाराष्ट्राच्या अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा कहर सुरु आहे. जालना, परभणी, दक्षिण नगर, सोलापूर, लातूर, धाराशिव या ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मराठवाड्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसल्याचे चित्र सद्यस्थितीला आहे. त्यामुळे या भागांत शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. जीवित आणि वित्तहानी झाली आहे. पशूधनाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळं मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. तर आज मंत्री दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करत आहे.

महायुतीचे मंत्री शेतीच्या बांधावर

दरम्यान, आज मुख्यमंत्री पुणे जिल्ह्यातील काही गावांना भेट देऊन पाहणी करणार आहेत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धाराशीव जिल्ह्यामधील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. पंकजा मुंडे ह्या बीड जिल्ह्यात ट्रॅक्टवर बसून नुकनासग्रस्त भागाची पाहणी करताहेत. तर मंत्री संजय शिरसाट हे करमाळा भागाची पाहणी करणार आहेत. कोणत्याही शेतकऱ्याने नुकसानीचे फोटो पाठवणे गरजेचे नाही. आमच्या विभागाचे कृषी आणि महसूलचे कर्मचारी स्वतः बांधावर जाऊन पंचनामे करतील, असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी

राज्यात पावसाळ्यात खूप नुकसान झाले आहे. अतिवृष्टी झाली आहे. पिकांची मोठं नुकसान झाले आहे. जालनामध्ये 2 लाख 54 एकर नुकसान आहे. सर्वात अधिक नांदेडमध्ये नुकसान झालेय. पंचनामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. नुकसान भरपाई लवकरमिळेल असा प्रयत्न सुरू आहे. ज्या भागात नुकसान आहे त्या ठिकाणी कर्ज वसुली थांबलीच पाहिजे. राज्य सरकार सूचना बँकांना देईल. 2215 कोटी रुपये काल शासनाने जमा केली आहे. अजून आकडे वाढत आहेत ती सुद्धा मदत लगेच मिळेल. दिवाळीच्या आधी कुठलीही मदत राहणार नाही. असं आश्वासन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत.

ताज्या बातम्या