Uddhav Thackeray – आम्ही विरोधी आहोत पण तुमच्या सडलेल्या मानसिकते विरोधी आहोत. राजकारणात मतभिन्नता असू शकते. पण राजकारणात द्वेष असता कामा नये. डावे आणि शिवसेना याच्यात देखील पूर्वी मोठ्या प्रमाणात संघर्ष झाला आहे. मला या कार्यक्रमासाठी उल्काताईंचा फोन आला होता. मी म्हटले हा कायदा किती वाईट आहे, हे लोकांना पटवून देत नाही, तोपर्यंत आपण थांबायचे नाही. आम्ही सगळे एकत्र येण्याचे करण म्हणजे आम्ही देशप्रेमी आहोत. असं उद्धव ठाकरे म्हणाले. आज जनसुरक्षा कायद्याच्या राज्यव्यापी परिषद, निर्धार मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यात ठाकरे बोलते होते.
मग तिकडे मोदी का जात आहेत?
या कायदायत कुठेही देशद्रोही असा उल्लेख केलेला नाही. हा कायदा कडवे, डावे विचारसरणीच्या लोकांसाठी असल्याचे बोलले जाते. रशिया आणि चीन हा डावा आहे. मग तिकडे मोदी का जात आहेत? भाजपाची भूमिका ही दुटप्पी नाहीतर कितीतरी तोंडी आहे. भाजपा हा केवळ आयत्या बिळावर बसलेला नागोबा आहे, असं शेलक्या शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपाचा समाचार घेतला. अगदी सर्वोच्य न्यायलायने ईडीला कित्येक वेळा कानफाडले आहे. भाजपाच्या एक व्यक्तींची नेमणूक केली.
पण आम्ही काय म्हटले की, आमच्यावर हातोडा पडणार. सध्या सर्वांचे लक्ष फरकटवले जात आहेत. तुम्ही बसा बोंबलत. आम्ही जे आमचे इप्सित आहे ते साध्य करुन घेतो. अशी टिका ठाकरेंनी भाजपावर केली.
तारीख पे तारीख …
आमच्यासह राष्ट्रवादीही फोडली, याबाबत कोर्टात तारीख पे तारीख सुरु आहे. याविरोधात राज्यपालांना जाऊन भेटलो, पण अजूनही आम्हांला न्याय मिळत नाही. मी सर्वोच्य न्यायाधीशांना विनंती करती की, आहे. की निकाल द्या. सुनावणी झाली पण बतावणी कधी करणार…? केवळ तारीख पे तारीख सुरु आहे, अशी टिका ठाकरेंनी कोर्टावर केली. सध्या कोण कबुतरच्या मागे लागतंय, तर कोण कुत्र्यांच्या, कबुतरच्या मागे लागतंय, मग कुत्र्यांच्या मागे लागल्यानंतर एक खंडपीठ नेमले गेले.
म्हणजे सुप्रीम कोर्टाची तत्परता किती बघा. म्हणजे खंडपीठाने जरी निकाल दिला तरी त्यात आम्ही लक्ष घालू, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेय कुत्र्यांच्या बाबतीत. जर कुत्री पकडली तर झाडावरची माकडं खाली येतील, असं मनेका गांधींनी म्हटलंय. मी कुठल्याही खासदाराचा अपमान करु इच्छित नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
काही झाले की नेहरुंचे नाव…
एका भाजपाच्या व्यक्तीची न्यायमूर्ती म्हणून निवड केली जाते, आज लोकशाही दारात तडफडत आहे. आज जरा काही झाले की, भाजप म्हणते की, काँग्रेसच्या काळात झाले. अहो तुमच्या जन्म पण नेहरूच्या काळात झाला होता. यात काय नेहरुंची चूक आहे. जो कोणी देशद्रोही आहे, त्याला लटकवा फासवार मग तो कोणीही असेना. असं उद्धव ठाकरे म्हणाले.
कायदामुळं देशात अराजकता येईल…
वसई-विरारमध्ये माजी आयुक्ताकडे पैसे सापडले, म्हणून त्यांना अटक केले, मग मंत्री यांच्याकडे पैशांची बँग रोकड सापडली मग त्यांना का अटक नाही? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित करत मंत्री संजय शिरसाट यांचे नाव न घेता टिका केली. जनसुरक्षा हा कायदा देशाला अराजतेकडे घेऊन जाणार आहे. देशाला स्वांतत्र्य मिळाले, उद्या स्वांतत्र्य दिन आपण साजरा करणार आहोत. पण ह्या जनसुरक्षेच्या दुसऱ्या स्वांतत्र्यांच्या लढाईच उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.





