Jayakumar Gore – गाव-खेड्यातील महिला बचत गटासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ‘उमेद’-महाराष्ट्र राज्य ग्रामीण अभियानांतर्गत राज्यातील महिला बचत गटातील उत्पादन ‘उमेद मॉल’मध्ये विकले जाणार आहे. त्यामुळं महिला बचत गटाची आर्थिक उलाढाल होणार आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा महत्वाचे निर्णय घेण्यात आला.
हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार…
दरम्यान, सध्या राज्यात 10 मॉल उभारण्यात येणार आहेत. यासाठी प्रत्येक मॉलला 20 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अशी माहिती मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. तसेच या मॉलमुळं राज्यातील ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. तसेच या महिला बतच गटाना प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास मंत्री जयकुमार गोरे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.
उद्यमशीलतेला चालना देण्यासाठी…
प्रत्येक उमेद मॉलसाठी कमाल २० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, हे मॉल जिल्हा परिषदेच्या जमिनीवर उभारण्यात येतील. मॉलमध्ये प्रत्येक गटाला चक्राकार पद्धतीने गाळे उपलब्ध करून दिले जातील. महिलांना संवाद आणि प्रशिक्षणासाठी स्वतंत्र हॉलची सुविधा देखील असेल. ग्रामीण भागातील महिलांतील उद्यमशीलतेला चालना देण्यासाठी सुरू झालेल्या स्वयं सहाय्यता समूहांच्या (SHG) विविध उत्पादनांना स्थानिक आणि राष्ट्रीय बाजारपेठ मिळावी या उद्देशाने हे केंद्र उभारले जाणार आहे.





