राज्य सरकार मुंबईत उभारतंय ‘पाताल लोक’, मुख्यमंत्र्यांची देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले ?

फडणवीस यांनी सांगितले की मुंबईत जमिनीवर धावणाऱ्या रस्त्यांच्या समांतर भूमिगत पातळीवर एक विशाल बोगदा जाळे तयार केले जाणार आहे. हे नेटवर्क संपूर्ण शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी निर्णायक ठरणार आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगितले की, त्यांचे सरकार मुंबईतील वाहतूक कोंडी आणि गर्दी कमी करण्यासाठी एक मोठे भूमिगत बोगद्याचे जाळे बांधत आहे. त्यांनी विनोदाने त्याचे वर्णन ‘पाताल लोक’ असे केले, म्हणजेच समांतर रस्ते व्यवस्था. युथ कनेक्ट सत्रात त्यांनी सांगितले की प्रस्तावित बोगद्यांचे जाळे अनेक दिशांना पसरेल आणि संपूर्ण शहर व्यापेल. ते म्हणाले, “मुंबई पूर्णपणे गर्दी कमी करण्यासाठी आम्ही ‘पाताल लोक’  बोगद्यांचे जाळे बांधत आहोत.” हे नेटवर्क विद्यमान प्रमुख रस्त्यांना समांतर प्रणाली म्हणून काम करेल. त्यामुळे राज्य सरकारची भूमिगत अंतर्गत रस्त्यांची योजना किती दूरगामी फायद्याची आहे, ते यावरून स्पष्ट होते.

पाताल लोक म्हणजे नेमका काय विषय ?

मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. मुंबईत वेगाने विकसित होणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आता आणखी एका महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पाची भर पडणार आहे. शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका अनोख्या प्रकल्पाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी या प्रकल्पाला दिलेल्या नावामुळे त्याची प्रचंड चर्चा सुरू झाली आहे.

मुंबईतील वाहतूक कोंडी आणि गर्दी कमी करण्यासाठी आमचे सरकार एक मोठे भूमिगत बोगद्याचे जाळे बांधणार आहे असे माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली. तसेच या प्रकल्पाचे वर्णन त्यांनी विनोदाने “पाताल लोक” असे केले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मुंबईतील 60 टक्के वाहतूक वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर चालते. मात्र तेथे वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. वाहतुकीची कोंडी पूर्णपणे दूर करण्यासाठी भुयारी मार्गांचे ‘पाताल लोक’ जाळे तयार केले जात आहे. हे जाळे सध्याच्या रस्त्यांचे एक शॅडो नेटवर्क म्हणून काम करेल. या नवीन समांतर रस्त्यांवर वाहनांचा सरासरी वेग 80 किमी प्रति तासअसेल. मेट्रो कॉरिडॉरचा विस्तार या योजनेला पूरक ठरेल, असेही ते म्हणाले.

पाताल लोकमुळे वाहतूक सुरळीत होईल?

“पाताल लोक” हा शब्द एका लोकप्रिय वेब सिरीजमुळे चर्चेत आला होता. फडणवीस यांनी प्रस्तावित भूमिगत रस्ते नेटवर्कचे वर्णन करण्यासाठी हा शब्द वापरला. फडणवीसांच्या कल्पनेतील “पाताल लोक” म्हणजेच जमिनीखालील समांतर रस्ते आहेत. या प्रकल्पामुळे संपूर्ण शहराची वाहतूक व्यवस्था एका नव्या पातळीवर पोहोचणार आहे. लोकप्रिय वेब सिरीजच्या नावाचा उल्लेख करत या प्रल्पाची घोषणा केल्याने त्यांची ही घोषणा सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाली आहे.

फडणवीस यांनी सांगितले की मुंबईत जमिनीवर धावणाऱ्या रस्त्यांच्या समांतर भूमिगत पातळीवर एक विशाल बोगदा जाळे तयार केले जाणार आहे. हे नेटवर्क संपूर्ण शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी निर्णायक ठरणार आहे. त्यांनी हे जाळे “Paatal Lok” असे संबोधताच या प्रकल्पाने मोठी चर्चा मिळवली. हे भूमिगत रस्ते विद्यमान रस्त्यांना पूरक ठरतील आणि त्याचबरोबर चालू मेट्रो मार्गांशीही समन्वय साधतील.


About Author

Rohit Shinde

Other Latest News