बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आणि वाऱ्याची दिशा बदलल्याने महाराष्ट्रातील बहुतांश भागात तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहे. कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव ओसरल्यानंतर पुन्हा थंडीचे प्रमाण वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे एकूणच कोकण वगळता महाराष्ट्राच्या इतर सर्वच भागांमध्ये थंडीचा प्रभाव वाढत जाणार आहे. मराठवाड्यातील तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहे. या काळात तापमान साधारणपणे 11 ते 13 अंशांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आता हवामान विभागाकडून वर्तविण्यात येत आहे.
5 डिसेंबरला राज्यातील थंडी कशी असेल?
डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात थंडीची लाट बघायला मिळाली. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात एक अंकी तापमानाची नोंद देखील झाली. 4 डिसेंबर रोजीही काही ठिकाणी शीत लहरींचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला होता. तर 5 डिसेंबरपासून राज्यात थंडीची लाट ओसरण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तरीही गारठा कायम असणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही नागरिकांना गोठवणारी थंडी सहन करावी लागत आहे.

मुंबईत तापमानात वाढ कायम आहे. तेथील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. मुंबईसह ठाणे जिल्ह्यातही निरभ्र आकाश राहून वातावरण कोरडे असणार आहे. ठाण्यातील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत तापमानात घट बघायला मिळत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी देखील नागरिकांना गुलाबी थंडी सहन करावी लागत आहे. पुण्यात 5 डिसेंबर रोजी मुख्यतः निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे. तेथील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. कोल्हापूरमधील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता आहे.
मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा जोर
मराठवाड्यातही गारठा कायम आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यतः निरभ्र आकाश राहून वातावरण कोरडे असणार आहे. तेथील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. नांदेड आणि परभणीमध्येही किमान तापमान 12 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील तापमानात सर्वाधिक घट बघायला मिळत आहे. 5 डिसेंबर रोजी नाशिकमधील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 10 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. तापमानात घट कायम असल्याने तेथील नागरिकांनी थंडीपासून संरक्षण करण्यासाठी उबदार कपडे वापरावे. तसेच आरोग्याची देखील काळजी घ्यावी.
विदर्भातही थंडीचा कडाका कायम आहे. कमाल तापमानात देखील घट झाल्याने दुपारच्या वेळीही गारवा जाणवत आहे. नागपूरमध्ये 5 डिसेंबर रोजी मुख्यतः निरभ्र आकाश राहून वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. तेथील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. तर अमरावतीमधील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या पहाटेच्या वेळी हाडे गोठवणारी थंडी नागरिकांना सहन करावी लागत आहे. पुढील काही दिवसांत राज्यातील तापमानाचा पारा सरासरी पेक्षा खाली येण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी आता स्वतःच्या आरोग्याची आणि शेतातील तूर पिकाची काळजी घेणे गरजेचे आहे.