मागील काही वर्षापासून महाराष्ट्रातील अनेक मार्गावर वेगवेगळ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन (Vande Bharat Express) चालवल्या जात आहेत. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमुळे प्रवास आणखी सोप्पा आणि आरामदायी झाला आहे. आता सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांसाठी आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे.पश्चिम महाराष्ट्रातील पुणे ते मराठवाड्यातील नांदेड यादरम्यान नवी वंदे भारत एक्सप्रेस धावणार असून या ट्रेनचा एक थांबा सोलापूर जिल्ह्यात आहे. त्यामुळे सोलापुरातून पुण्यात किंवा मराठवाड्यात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
नांदेड पुणे वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express)
नांदेड ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही ट्रेन 2025 च्या अखेरीस सुरू होईल अशी शक्यता आहे. या ट्रेनला सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी रेल्वे स्थानकावर सुद्धा थांबा मिळणार असल्याचं बोलले जात आहे. नांदेड ते पुणे या रेल्वे मार्गाचे अंतर 550 किलोमीटर इतके असून या प्रवासासाठी सध्या ज्या एक्सप्रेस ट्रेन सुरू आहेत त्यातून प्रवास करायचं झाल्यास १० ते १२ तास लागतात. परतू एकदा का नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली की मग हाच प्रवास अवघ्या ७ तासांवर येणार आहे. म्हणजेच सोलापूर करांचा ५ तासांचा वेळ वाचणार आहे.
कसं असेल वेळापत्रक
दरम्यान पुणे – नांदेड वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन (Vande Bharat Express) नांदेड, लातूर, धाराशिव, कुर्डूवाडी, दौंड आणि पुणे या प्रमुख स्थानकांवर थांबेल आहे.आठवड्यातून 5 ते 6 दिवस ती धावेल, अशी शक्यता आहे. या मार्गावरील अंदाजित तिकीट दर एसी चेअर कारसाठी ₹1500 ते ₹1900 दरम्यान असू शकतो. रेल्वे प्रशासन लवकरच या ट्रेनच्या उद्घाटनाची अधिकृत तारीख आणि वेळापत्रक जाहीर करणार आहे. परंतु अद्याप रेल्वे कडून या संदर्भात अधिकृत नोटिफिकेशन निघालेले नाही.





