MP Breaking News
Wed, Dec 17, 2025

माधुरी हत्तीणीला कोल्हापुरात परत आणण्यात वनताराही मदत करणार, काय म्हणाले मुख्यमंत्री?

Written by:Smita Gangurde
Published:
ल्हापूरकरांनी उभारलेला लढा ,राज्य सरकारसह नांदणी मठानं पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा घेतलेला निर्णय आणि आता वनतारानं घेतलेली सकारात्मक भूमिका यामुळं माधुरी हत्तीण पुन्हा कोल्हापुरात परतणार अशी आशा निर्माण झालीय
माधुरी हत्तीणीला कोल्हापुरात परत आणण्यात वनताराही मदत करणार, काय म्हणाले मुख्यमंत्री?

मुंबई– वनतारात असलेली कोल्हापूर जिल्ह्यातील माधुरी हत्तीण पुन्हा कोल्हापुरात परतण्याची शक्यता आहे. नांदणी मठात माधुरीला पाठवण्यासाठी खुद्द वनतारानेचं पुढाकार घेतलाय वनताराचे सीईओ यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली त्यानंतर नांदणी मठात जात त्यांनी स्वामींची भेट घेत आपली भूमिका मांडली

माधुरीसाठी दाखल करण्यात येणाऱ्या पुनर्विचार याचिकेसाठी मठाच्या, राज्य सरकारनं बाजूनं सहभागी होण्याचं वनतारानं स्पष्ट केलंय. यामुळं माधुरी हत्तीणीचा कोल्हापुरात परतण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

वनतारानं मागितली माफी

माधुरीचं कोल्हापूरकरांसाठी असलेलं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व याची वनतारानं नोंद घेतली आहे. वनतारानं अधिकृत निवेदन जाहीर करत माधुरीला परत पाठवण्याची तयारी दर्शवलीय. जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे आमचे विचार, शब्द किंवा कृतीने कोल्हापूरकरांना दुखावले असेल क्षमा करा असं वनतारानं म्हटलंय

वनताराचं काय निवेदन?

भक्त, मठाचे नेते आणि लोकांच्या भावनांची पूर्ण जाणीव आणि कदर आम्ही करतो. माधुरीला हलविण्याचा निर्णय न्यायालयाने त्यांच्या अधिकारात घेतला होता.
वनताराची भूमिका केवळ माधुरीची देखभाल करणे, तिला पशुवैद्यकीय सहाय्य पुरविणे आणि तिच्या निवासाची व्यवस्था करणे अशी होती. वनताराने कोणत्याही टप्प्यावर माधुरीचे स्थलांतर करण्याची शिफारस केली नाही धार्मिक प्रथा किंवा भावनांमध्ये हस्तक्षेप करण्याचा वनताराचा कोणताही हेतू नव्हता.कायदेशीर वर्तन, प्राण्यांची जबाबदारीने काळजी घेणे आणि सामुदायिक सहकार्य यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
माधुरीला कोल्हापूरला परत आणण्यासाठी मठ आणि महाराष्ट्र सरकार यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर केलेल्या कायदेशीर अर्जास वनतारा पूर्ण पाठींबा देईल.

माधुरीसाठी पुनर्वसन केंद्र सुरु करणार?

नांदणी परिसरात माधुरीसाठी पुनर्वसन केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव वनतारानं ठेवलाय. यासाठी नांदणी मठ आणि राज्य सरकारशी समन्वय साधून सुविधा विकसित केली जाईल असं वनतारानं म्हटलंय प्रस्तावित केंद्रामध्ये पुढील सोयी-सुविधा निर्माण करण्यात येतीलसांधे आणि स्नायूंवर उपचार करण्यासाठी हायड्रोथेरपी तलाव, पोहणे आणि नैसर्गिक हालचालीसाठी वेगळे तळे, शारीरिक पुनर्वसनासाठी लेसर थेरपी आणि उपचार कक्ष, विश्रांती आणि संरक्षणासाठी रात्री निवास, साखळ्या शिवाय मोकळेपणाने हालचाली करण्यासाठी हिरवीगार मोकळी जागा, माधुरीच्या नैसर्गिक विधींसाठी वाळूने भरलेला हौद
सतत वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज ऑन-साइट पशुवैद्यकीय दवाखाना, माधुरीला सुरक्षित आणि आरामदायी विश्रांती घेता यावी यासाठी रबराइज्ड फ्लोअरिंग प्लॅटफॉर्म , आडवे होऊन झोपण्यासाठी खास काळजी घेऊन तयार केलेले मऊ वाळूचे ढिगारे हे उपलब्ध करुन देणार आहेत.

माधुरी परतण्याची आशा पल्लवित

माधुरी हत्तीणीवरुन सोशल मिडीयावर लढाई रंगल्याचं बघायला मिळतंय हिंदुस्थानी भाऊनं व्हिडीओ पोस्ट करत वनताराची पाठराखण केली होती. आता यावरुन संतापलेल्या कोल्हापूरकरांनी हिंदुस्थानी भाऊचा चांगलाच समाचार घेतलाय माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी कोल्हापूरकरांनी उभारलेला लढा ,राज्य सरकारसह नांदणी मठानं पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा घेतलेला निर्णय आणि आता वनतारानं घेतलेली सकारात्मक भूमिका
यामुळं माधुरी हत्तीण पुन्हा कोल्हापुरात परतणार अशी आशा निर्माण झालीय मात्र त्यासाठी कोल्हापूरकरांनी आपला बाणा कायम ठेवला पाहिजे