MP Breaking News
Tue, Dec 16, 2025

मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांना पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचे काम आम्ही करतोय, उबाठाने आत्तापर्यंत काय केले? शिंदेंचा सवाल

Written by:Astha Sutar
Published:
Last Updated:
रामदास कांबळे यांच्या मतदारसंघात संक्रमण शिबिरात राहणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असून, त्यातील बहुतांश प्रश्न हे म्हाडा आणि एसआरए प्राधिकरणाची संबंधित आहेत, हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी ते शिवसेनेसोबत आले आहेत. शासनाच्या माध्यमातून हे प्रश्न नक्की सोडवण्याचा प्रयत्न करु असे यावेळी शिंदेंनी आश्वासन दिले.
मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांना पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचे काम आम्ही करतोय, उबाठाने आत्तापर्यंत काय केले? शिंदेंचा सवाल

Eknath Shinde – मुंबई महानगरपालिकेतील सायन कोळीवाडा प्रभाग क्रमांक १७३चे उबाठा गटाचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी आज ठाणे येथील आनंदआश्रमात येऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भगवा झेंडा हाती. देत त्यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिंदे यांनी त्यांची युवासेनेच्या कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती जाहीर केली. यानंतर एकनाथ शिंदेंनी उबाठा गटावर जोरदार निशाणा साधला.

मुंबईचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न…

गेल्या अडीच वर्षाचा माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मुंबईचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला आहे. तसेच कॅशलेस वैद्यकीय सेवा, डीप क्लीन ड्राइव्ह असे अनेक उपक्रम आपण शहरात राबवले. कोस्टल रोड, अटल सेतू, महालक्ष्मी रेस्कोर्सच्या जागेवर तयार होणारे सेंट्रल पार्क, काँक्रिट रस्ते, मुंबईचे सुशोभिकरण, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असे अनेक प्रकल्प मार्गी लावले. महत्वाचे म्हणजे मुंबईबाहेर गेलेला मुंबईकरांना पुन्हा मुंबईमध्ये आणण्यासाठी आम्ही काम करतोय, पण उबाठाने आत्तापर्यंत मुंबईकरांसाठी काय केले? असा सवाल शिंदेंनी उपस्तित करत ठाकरे गटावर टिका केली.

माजी नगरसेवक रामदास कांबळेंचा सेनेत प्रवेश

मुंबई महानगरपालिकेतील सायन कोळीवाडा प्रभाग क्रमांक १७३चे उबाठा गटाचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी आज ठाणे येथील आनंदआश्रमात येऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भगवा झेंडा हाती. देत त्यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिंदे यांनी त्यांची युवासेनेच्या कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती जाहीर केली. यावेळी बोलताना शिंदे यांनी, मुंबईतील अनेक माजी लोकप्रतिधी आजही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करत आहेत. पक्षप्रवेशांचा ओघ अद्यापही कमी झालेला नाही, असं म्हटले.