मुंबईतील पवईतून सातत्याने मोठ्या घडामोडी आज दिवसभर समोर येत होत्या. मुंबईतील पवई येथील आरए स्टुडिओत साधारण 17 मुलांना डांबून ठेवणाऱ्या रोहित आर्य या व्यक्तीचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ओलीस ठेवलेल्या मुलांची सुटका करतान पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. यातच त्याचा मृत्यू झाला. रोहित आर्याच्या छातीला गोळी लागली होती.
मुलांची सुटका केल्यानंतर रोहित आर्या याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता रोहित आर्याचे एन्काऊंटर करण्यात आल्याचे समोर आले आहे. उपचारादरम्यान रोहितने जीव गमावला. दरम्यान, आज दिवसभर चर्चेत राहणार रोहित आर्य नेमका कोण? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

रोहित आर्य नेमका कोण?
समोर येणाऱ्या माहितीनुसार, रोहित आर्या हे पुण्यातील एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते प्रोजेक्ट लेट्स चेंज या संस्थेचे संस्थापक व संचालक आहेत. २०१३ मध्ये गुजरातमध्ये त्यांनी “स्वच्छता मॉनिटर” हा उपक्रम सुरू केला होता, ज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले होते. प्रोजेक्ट लेट्स चेंज (PLC) – ही NGO आहे, जी शाळांमध्ये स्वच्छता जागृती आणि मुलांना स्वच्छता दूत बनवण्यावर काम करते. त्यांची वेबसाइट: swachhtamonitor.in. ही असल्याची माहिती समोर येत आहे.
स्वच्छता मॉनिटर उपक्रम: महाराष्ट्र शाळांमध्ये २०२२ मध्ये शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या सूचनेनुसार सुरू केला. स्वतःच्या खर्चाने चालवला. शिक्षकांना प्रशिक्षण, मुल्यमापन इ. कामे केले. “माझी शाळा, सुंदर शाळा” अभियानात समाविष्ट. मात्र यामधील बरेच सरकारने रोहितला दिले नाही, अशी रोहितची तक्रार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.
रोहित आर्य मागील काही दिवसांपूर्वी उपोषणाला बसला होता, सरकारकडे त्याचे पैसे आहेत, त्याने लोन काढून शिक्षण विभागासाठी एक प्रोजेक्ट केला होता. स्वच्छता मॉनिटरसंदर्भातील या प्रोजेक्टसाठी त्याचे पैसे लागले असून सरकारने त्याचे पैसे न दिल्याने कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. याप्रकरणी, पोलीस अधिक तपास करत आहेत.
आरोपीचा मृत्यू झाल्याची माहिती
अग्निशमन दल आणि मदतीने अखेर ओलीस ठेवणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेत मुलांची सुटका करण्यात आली. यावेळी, आरोपी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली असून पोलिसांच्या चकमकीत आरोपी रोहित आर्यचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर झाला असून आरोपीने पोलिसांवर गोळी झाडल्यानंतर पोलिसांनीही जशास तसं प्रत्युत्तर दिलं. त्यावेळी, आरोपीच्या छातीत गोळी लागली होती. त्यामुळे, रोहित आर्यला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.











