बाळासाहेबांचा दोन दिवस मृतदेह का ठेवला? याच्या सीबीआय चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, कदमांचा अनिल परबांवर आरोप काय?

हे कुरघोडीचे आणि सूडाचे राजकारण करताहेत. खरी गद्दारी आणि नमक हराम तर उद्धव ठाकरे आहेत. कारण त्यांनी आमचे मीठ खाल्ले आहे. आम्ही बाहेर पडल्यानंतर आता अनिल परब नेते झालेत.

Ramdas Kadam on Anil Parab – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृहदेह 2 दिवस तसाच ठेवण्यात आला. आणि त्यानंतर त्यांच्या बोटाचे ठसे घेण्यात आले. असा आरोप दसरा मेळाव्यात शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला. यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब (Anil Parab On Ramdas Kadam) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. रामदास कदम यांचे आरोप फेटाळून लावत, त्यांनी आरोप सिद्ध करुन दाखवावे, अन्यथा मी त्यांच्याविरोधात कोर्टात दावा ठोकणार असल्याचं अनिल परब यांनी म्हटलं आहे. यानंतर रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत नवीन गौप्यस्फोट करत अनिल परब यांच्यावर काही आरोप केले आहेत.

सीबीआय चौकशी व्हावी…

दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृहदेह 2 दिवस तसाच मातोश्री येथे ठेवण्यात आला होता. तसेच त्यांच्या बोटाचे ठसे घेण्यात आले. यावर उद्धव ठाकरेंनी पुढे येऊन बोललं पाहिजे. त्यांच्या चेले चपाटे यांना काही माहित नाही. उद्धव ठाकरेंनी बोललं पाहिजे. तसेच त्यावेळेचे डॉक्टरांनी देखील पुढे येऊन बोललं पाहिजे. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबाबत सीबीआय चौकशी व्हावी, अशी आपण मागणी करणार आहोत, आणि यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत, असं रामदास कदम म्हणाले.

स्मशान भूमीत बकरे का कापले…?

एकिकडे अनिल परब यांनी माझ्या बायकोने आत्महत्या का केली, की करायला लावली. असा आरोप केला आहे. पण स्टोव्हचा भडका होऊन माझ्या बायकोच्या साडाली आग लागली. असं कदम यांनी म्हटलं आहे. पण अनिल परब यांनी रात्रीच्या वेळी स्मशान भूमीत योगेश कदम आणि सिद्धेश कदम यांच्या नावाने दोन बकरे कापले.  त्यांच्यासारख्या दिसणा-या व्यक्तीने बकरे कापले. याबाबत अनिल परब यांनी खुलासा करावा, असा आरोप रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर केला.

उद्धव ठाकरे हेच नमक हराम…

रामदास कदमांच्या बायकोने जाळून घेतलं की तिला जाळलं? असा सवाल करत रामदास कदम यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी अनिल परब यांनी केली. तर मुद्दामहून आमच्या पाठीमारे उद्धव ठाकरे लागले आहेत. हे कुरघोडीचे आणि सूडाचे राजकारण करताहेत. खरी गद्दारी आणि नमक हराम तर उद्धव ठाकरे आहेत. कारण त्यांनी आमचे मीठ खाल्ले आहे. आम्ही बाहेर पडल्यानंतर आता अनिल परब नेते झालेत. परब कोण आहेत. अख्या मंत्रिमंडळात फक्त योगेश कदम दिसतोय का. अनिल परब यांनी जे आरोप केलेत, त्याचा मी धिक्कार…निषेध करतो, असं रामदास कदम म्हणाले.


About Author

Astha Sutar

Other Latest News