parliament Winter Session: उद्यापासून संसदेचं हिवाळी अधिवेशन; मोदी सरकार 14 विधेयकं मांडणार !

Written by:Rohit Shinde
Published:
उद्या म्हणजेच 1 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत असून ते 19 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात केंद्र सरकार 14 विधेयके सादर करणार आहे. त्यामुळे हे अधिवेशन महत्वाचे ठरणार आहे.
parliament Winter Session: उद्यापासून संसदेचं हिवाळी अधिवेशन; मोदी सरकार 14 विधेयकं मांडणार !

राजधानी नवी दिल्लीत हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू आहे. उद्या सोमवार 1 डिसेंबरपासून या अधिवेशनाला सुरुवात होत आहे.हे अधिवेशन ते 19 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात केंद्र सरकार लोकसभा आणि राज्यसभेत 14 विधेयके सादर करणार आहे. अशातच आता या विधेयकांसह अनेक मुद्द्यांवर केंद्र सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये गदारोळ होण्याची शक्यता आहे. नेहमी प्रमाणे यावेळीही अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीला जेपी नड्डा, किरेन रिजिजू, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, गौरव गोगोई, काँग्रेसचे प्रमोद तिवारी, कोडिकुनिल सुरेश, तृणमूल काँग्रेस नेते डेरेक ओ’ब्रायन, समाजवादी पक्षाचे राम गोपाल यादव, द्रमुकचे तिरुचित शिवा आणि इतर अनेक पक्षांचे नेते होते.

15 दिवस होणार संसदेचे कामकाज

राजधानी दिल्लीत हिवाळी अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली आहे. सोमवार 1 डिसेंबरपासून या अधिवेशनाला सुरुवात होत असून ते 19 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात केंद्र सरकार लोकसभा आणि राज्यसभेत 14 विधेयके सादर करणार आहे. यातील काही विधेयके ही खास असणार आहेत. 1 डिसेंबर ते 19 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या हिवाळी अधिवेशनात 15 कामकाजाचे दिवस असणार आहेत. विरोधी पक्षाने हे अधिवेशन लहान असल्याचे म्हणत महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर आणि सखोल चर्चा करण्याची मागणी केली आहे. कारण हिवाळी अधिवेशनात अंदाजे 20 कामकाजाचे दिवस असतात, मात्र यावेळी फक्त 15 कामकाजाचे दिवस असणार आहेत. सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षाने हा मुद्दा उपस्थित केला होता, मात्र यावर सरकारकडून अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही.

सरकार कोणती 14 विधेयकं मांडणार ?

  1. सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था (सुधारणा) विधेयक, २०२५
  2. दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता (सुधारणा) विधेयक, २०२५ (आयबीसी)
  3. मणिपूर वस्तू आणि सेवा कर (दुसरी सुधारणा) विधेयक, २०२५ – अध्यादेशाची जागा घेणार
  4. रद्द करणे आणि सुधारणा विधेयक, २०२५
  5. राष्ट्रीय महामार्ग (सुधारणा) विधेयक, २०२५
  6. अणुऊर्जा विधेयक, २०२५
  7. कॉर्पोरेट कायदे (सुधारणा) विधेयक, २०२५
  8. सिक्युरिटीज मार्केट्स कोड बिल (एसएमसी), २०२५
  9. विमा कायदे (सुधारणा) विधेयक, २०२५
  10. मध्यस्थी आणि सामंजस्य (सुधारणा) विधेयक, २०२५
  11. भारतीय उच्च शिक्षण आयोग विधेयक, २०२५
  12. केंद्रीय उत्पादन शुल्क (सुधारणा) विधेयक, २०२५
  13. आरोग्य सुरक्षा उपकर/राष्ट्रीय सुरक्षा सेस बिल, २०२५
  14. 2025-26 आर्थिक व्यवसाय अनुदानासाठी पुरवणी मागण्या

1 डिसेंबर ते 19 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या हिवाळी अधिवेशनात 15 कामकाजाचे दिवस असणार आहेत. विरोधी पक्षाने हे अधिवेशन लहान असल्याचं म्हणत महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर आणि सखोल चर्चा करण्याची मागणी केली आहे.  त्यामुळे यावेळी संसदेत नेमकं काय घडतं, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews