अनेक वेळा गुगल मॅपच्याआधारे आपल्याला हव्या असलेल्या ठिकाणी आपण पोहोचचो, मात्र गुगल मॅप नॅव्हिगेशनमधील चुकांमध्ये अपघात होऊन अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. अशीच एक घटना नवी मुंबईच्या बेलापूर खाडी परिसरात घडली आहे. गुगल मॅपच्या आधारे उलवेला जाणारी भरधाव कार थेट खाडीत कोसळल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास बेलापूरमध्ये घडली. घटनेवेळी तिथे उपस्थित असलेल्या सागरी सुरक्षा पोलिसांनी वेळीच महिलेचे प्राण वाचवले.
महिलेचे प्राण थोडक्यात वाचले!
रोजच्या जीवनात अनेक वेळा गुगल मॅपच्याआधारे आपल्याला हव्या असलेल्या ठिकाणी आपण पोहोचचो, मात्र अशा घटना अनेकदा घडतात की गुगल मॅपच्या सहाय्याने जात असतानाही आपण चुकतो, अशीच एक घटना समोर आली आहे, मात्र या वेळी हे प्रकरण चांगलंच अंगलट आलं असतं आणि एकाचा जीव गेला असता. गुगल मॅपच्या आधारे उलवेला जाणारी भरधाव कार थेट खाडीत कोसळल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास बेलापूरमध्ये घडली. घटनेवेळी तिथे उपस्थित असलेल्या सागरी सुरक्षा पोलिसांनी वेळीच महिलेचे प्राण वाचवले. शिवाय क्रेनच्या साहाय्याने खाडीत पडलेली कार देखील बाहेर काढण्यात आली.
ही घटना घडली त्या परिसराच्या जवळच असलेल्या सागरी सुरक्षा पोलिसांच्या निदर्शनात ही बाब आली. यामुळे सागरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, कारमधील महिला वाहत जात असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांना गस्ती व रेस्क्यू बोटीच्या साहाय्याने बाहेर काढून त्यांचा प्राण वाचवण्यात आला. तर खाडीत पडलेली कार क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आली.
गुगल मॅप वापरताना सावधान!
आजच्या डिजिटल युगात गुगल मॅप्स हे मार्गदर्शनासाठी उपयुक्त साधन ठरले आहे. मात्र, अंधविश्वास ठेवून केवळ मॅपवर अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते. अलीकडेच नवी मुंबईतील बेलापूर खाडीत चुकीच्या मार्गदर्शनामुळे कार कोसळल्याची घटना घडली, ज्यात एक महिला जखमी झाली. अशा घटनांची संख्या वाढत आहे.
गुगल मॅप वापरताना पुढील गोष्टी लक्षात घ्या:
-
नेहमी आजूबाजूच्या पाट्यांकडे आणि स्थानिकांच्या सूचनेकडेही लक्ष द्या
-
रात्रीच्या वेळेस अनोळखी ठिकाणी सावधगिरी बाळगा
-
शक्य असल्यास प्रवासपूर्वी मार्गाची खात्री करून ठेवा
-
फूटपाथ, नदी, बंद रस्ते यांची मॅपवर पडताळणी करा
-
अनोळखी रस्त्यांवर वाहन चालवताना वेग मर्यादेत ठेवा
डिजिटल साधनांचा उपयोग आवश्यक आहे, पण आपल्या सुरक्षिततेसाठी सजग राहणे तितकेच महत्त्वाचे आहे.





