MP Breaking News
Fri, Dec 19, 2025

लाडक्या बहिणींना 2,100 रूपये कधी मिळणार? मंत्री आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितले…

Written by:Rohit Shinde
Published:
आता लाडक्या बहिणींना 2,100 रूपये कधी मिळणार? या प्रश्नावर मात्र महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी स्पष्ट उत्तर दिले आहे.
लाडक्या बहिणींना 2,100 रूपये कधी मिळणार? मंत्री आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितले…

लाडक्या बहिणींच्या खात्यात महिन्याला 1,500 रूपये जरी वेळोवेळी जमा होत असले तरी 2,100 रूपये मिळण्याची लाडक्या बहिणींची प्रतीक्षा काही अद्याप संपलेली नाही. एकिकडे मागील जुलै महिन्याचे 1,500 रूपये काही महिलांच्या खात्यात जमा झाले असून उद्यापर्यंत सर्व महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत. या परिस्थितीमध्ये आता लाडक्या बहिणींना 2,100 रूपये कधी मिळणार? या प्रश्नावर मात्र महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी स्पष्ट उत्तर दिले आहे.

जुलैचे 1,500 मिळाले; 2,100 कधी मिळणार?

रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर रक्षाबंधन अर्थात ९ जुलैच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हफ्ता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. बहुतांश लाडक्या बहिणींना या पैशांचा लाभ मिळालेला आहे. तर उर्वरीत लाडक्या बहिणींना उद्यापर्यंत या योजनेचे 1,500 मिळणार आहे. यासंदर्भात माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी नुकतीच दिली. यानंतर आता लाडकी बहीण योजनेच्या वाढीव रकमेसंदर्भात मंत्री आदिती तटकरेंनी देखील भाष्य केले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना १५०० ऐवजी २१०० रूपये देण्याचा निर्णय शासन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिदे आणि अजित पवार, मंत्रिमंडळ घेतील’, असं वक्तव्य आदिती तटकरेंनी केलं. ते कोल्हापूर येथे बोलत होत्या. पुढे त्या असंही म्हणाल्या की, ही योजना पुढे कायम अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे. त्यामुळे आदिती तटकरेंनी हा चेंडू मुख्यमंत्री आणि वरिष्ठांच्या कोर्टात टोलवल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.

सरकारने निश्चित केलेल्या निकषांचं उल्लंघन करून अनेक महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं आता समोर आलं आहे, चक्क सरकारी नोकरीला असलेल्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. यावर आता मंत्री आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारी नोकरीला असूनही लाभ घेणाऱ्या महिलांवर आगामी काळात कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

सरकारची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई होणार!

ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत मिळावी, या उद्देशानं सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. ही एक सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीज हजार रुपये जमा करण्यात येतात. मात्र आता सरकार या योजनेबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे, त्यामुळे रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसू शकतो.

कारवाईसाठी सरकारी पातळीवर हालचालींना वेग !

लाडकी बहीण योजनेत ज्यांनी फसवणूक केली त्यांच्यावर सरकार कारवाई करण्याच्या तयारीमध्ये आहे. लाडकी बहीण योजने अंतर्गत अनधिकृत लाभ घेतलेल्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार 15 दिवसांच्या आत जिल्हाधिकाऱ्यांकडून खात्यांची माहिती मागवण्यात आली आहे, या मध्ये ज्या महिला दोषी आढळतील, त्यांच्याकडून संपूर्ण रक्कम वसूल केली जाण्याची शक्यता आहे, तसेच संबंधितांवर गुन्हे देखील दाखल केले जाऊ शकतात, त्यामुळे आता संबंधितांवर सरकार नेमकी कशा प्रकारे कारवाईची पाऊले उचलते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.