आयटीत जॉब करताना कलेची आवड जोपासली; पण, अचानक मृत्यूला कवटाळलं!

Rohit Shinde
कलाविश्व हे सर्जनशीलतेचे आणि स्पर्धेचे क्षेत्र आहे. येथे यश मिळवण्यासाठी सातत्य, मेहनत आणि मानसिक स्थैर्य आवश्यक असते. अनेक तरुण कलाकार मोठी स्वप्ने घेऊन या क्षेत्रात येतात, पण अपयश, आर्थिक अडचणी, संधींचा अभाव आणि ओळख न मिळणे यामुळे त्यांच्यावर मानसिक ताण वाढतो. या ताणातून नैराश्य आणि आत्महत्यांसारखे टोकाचे पाऊल उचलण्याच्या घटना वाढत आहेत. जळगाव जिल्ह्यातील उंदीरखेडे गावातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

होतकरू तरूणाने जीवन संपवले !

चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असतानाच मराठी अभिनेत्याने उचललं टोकाचं पाऊल….जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील उंदिरखेडे या गावचा होतकरू तरुण सचिन चांदवडे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. २३ ऑक्टोबर रोजी दुपारी सचिन त्याच्या घराच्या वरच्या मजल्यावरच्या रूममध्ये होता. दुपारी दीडच्या सुमारास त्याने फॅनला दोरी बांधून गळफास घेतला. बऱ्याच वेळाने दार उघडत नसल्याचे पाहून घरच्यांनी धावाधाव केली. त्याला ताबडतोब रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र २४ ऑक्टोबर रोजी रात्री त्याची प्राणज्योत मालवली.

सचिनच्या आत्महत्येमुळे कुटुंबाला धक्का

सचिनच्या या टोकाच्या निर्णयाने त्याचे कुटुंबीय दुःखाच्या छायेत आहेत. सचिन पुण्यात विप्रो कंपनीत इंजिनिअर म्हणून नोकरी करत होता. सोबतच अभिनयाची आवड जोपासत असताना विषय क्लोज, असूरवन, जमतारा २ मध्ये तो मुख्य भूमिका साकारू लागला. चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असतानाच सचिनने हे टोकाचं पाऊल उचललं असल्याने कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या