MP Breaking News
Sat, Dec 13, 2025

Zoo In Jat : पश्चिम महाराष्ट्रातील या तालुक्यात उभारण्यात येणार भव्य प्राणी संग्रहालय; 100 एकर जमीन, 400 प्रकाराचे प्राणी

पुण्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातले दुसरे सर्वात मोठं प्राणी संग्रहालय जत तालुक्यात होणार असल्याची माहिती भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली. त्यामध्ये जवळपास 400 प्रकारचे वेगवेगळे प्राणी असतील
Zoo In Jat : पश्चिम महाराष्ट्रातील या तालुक्यात उभारण्यात येणार भव्य प्राणी संग्रहालय; 100 एकर जमीन, 400 प्रकाराचे प्राणी

Zoo In Jat : सध्या सर्वत्र बिबट्याने खळबळ उडवून दिली आहे खास करून पश्चिम महाराष्ट्रातील जुन्नर ,पुणे ,सातारा, सांगली या भागात बिबट्याने हैदोस घातलाय. बिबट्यांची दहशत माणसाला नीट जगून देईना. बिबट्यांचा काहीतरी बंदोबस्त आता केलाच पाहिजे अशी प्रतिक्रिया जनतेतून येते आहे. याच दरम्यान, आता कितीही बिबटे येऊद्या , त्याची सोय आम्ही प्राणिसंग्रहालयात करणार आहोत असं सांगत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत मध्ये उभारण्यात येणाऱ्या भव्य प्राणी संग्रहालयाबद्दलची माहिती दिली.

काय म्हणाले गोपीचंद पडळकर – Zoo In Jat

पुण्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातले दुसरे सर्वात मोठं प्राणी संग्रहालय जत तालुक्यात होणार असल्याची माहिती भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली. त्यामध्ये जवळपास 400 प्रकारचे वेगवेगळे प्राणी असतील. तसेच बिबट्यांची देखील जत तालुक्यातील या प्राणी संग्रहालयात राहण्याची सोय करू असं गोपीचंद पडळकर म्हणाले. जवळपास 100 एकरांमध्ये 150 कोटीचा या प्राणी संग्रहालयाचा प्रस्ताव असणार आहे. राज्य सरकारची या प्राणी संग्रहालयाला मान्यता मिळालेली असून आता हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवू आणि पुढच्या दोन-तीन महिन्यामध्ये मंजूर करून घेऊ. जो बिबट्या लोकांना त्रास देतोय त्या बिबट्याला आम्ही आमच्या प्राणी संग्रहालय टाकणार आहोत आणि त्याच्यावर तिथे उपचारही करू असे पडळकर म्हणाले.

प्राणीसंग्रहालयाला अहिल्यादेवी होळकरांचे नाव

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने हे प्राणी संग्रहालय (Zoo In Jat) उभारण्यात येईल. हे प्राणी संग्रहालय पुढील एक ते दीड वर्षात तयार व्हावं असा आमचा प्रयत्न आहे. 100 एकर मध्ये प्राणी संग्रहालय असं पश्चिम महाराष्ट्रात इतर कुठेही बघायला मिळणार नाही त्यामुळे या प्राणी संग्रहालय नंतर सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील पर्यटन मोठ्या प्रमाणावर घेतला येथील असा विश्वासही गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला..