UPI: युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; व्यवहार करण्याआधी नवे नियम जाणून घ्या!

3 नोव्हेंबरपासून म्हणजेच आजपासून यूपीआय व्यवहारांसाठी काही नवीन नियम अंमलात आणण्यास सुरूवात झाली आहे. त्या बदलांबाबत आणि नव्या नियमांबाबत सविस्तर जाणून घेऊ...

ऑनलाईन युपीआयद्वारे पेमेंट करणाऱ्यांची संख्या देशामध्ये दिवसेंदिवस वाढत चालली आहे, देशातील युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस अर्थात युपीआयद्वारे पेमेंटला सार्वनजिक रूप आले आहे, त्यांची स्विकारार्हता वाढली आहे. गत आर्थिक वर्षांच्या सहामाहीत युपीआय व्यवहारांचे प्रमाण 42 टक्क्यांनी वाढल्याचे निष्पन्न झाले आहे. हे व्यवहार 92.23 अब्जांवर पोहोचले आहेत. इंडिया डिजिटल पेमेंट्सच्या ताज्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. अशा परिस्थितीत युपीआय व्यवहारांचे प्रमाण वाढत असताना नियमांमध्ये देखील सातत्याने बदल होताना दिसत आहेत.

युपीआय व्यवहारात मोठे बदल

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी हे बदल जाहीर केले असून, त्यांचा उद्देश व्यवहार अधिक वेगवान आणि सुरक्षित बनवणे हा आहे. त्यामुळे यूपीआय वापरणाऱ्या सर्वांनी हे नवे नियम समजून घेणे आवश्यक आहे. आत्तापर्यंत यूपीआय व्यवहारांच्या दैनंदिन प्रक्रियेसाठी आरटीजीएस पद्धतीने एकूण 10 सेटलमेंट सायकल्स चालवल्या जात होत्या. या प्रत्येक सायकलमध्ये अधिकृत व्यवहारांसोबतच वादग्रस्त व्यवहारही एकत्र प्रक्रियेत घेतले जात होते. परंतु, वाढत्या व्यवहारांच्या प्रमाणामुळे ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे कठीण होत होते. त्यामुळे एनपीसीआयने आता या दोन्ही प्रकारच्या व्यवहारांना स्वतंत्र सायकलमध्ये विभागण्याचा निर्णय घेतला आहे.

पहिल्या दहा सायकल्स फक्त अधिकृत व्यवहारांसाठीनवीन नियमानुसार, पहिल्या दहा सायकल्स फक्त अधिकृत व्यवहारांसाठी असतील. म्हणजे, यात कोणत्याही प्रकारचे वादग्रस्त व्यवहार येणार नाहीत. या सायकल्स ठराविक वेळेनुसार चालतील. पहिली सायकल रात्री 9 वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत, दुसरी मध्यरात्रीपासून सकाळी 5 वाजेपर्यंत, तिसरी 5 ते 7, चौथी 7 ते 9, पाचवी 9 ते 11, सहावी 11 ते 1, सातवी 1 ते 3, आठवी 3 ते 5, नववी 5 ते 7, आणि दहावी सायकल रात्री 7 ते 9 वाजेपर्यंत असेल. जुन्या आरटीजीएस पोस्टिंग किंवा कट-ओव्हर टायमिंगमध्ये कोणताही बदल होणार नाही.

या व्यवहारांसाठी स्वतंत्र दोन सायकल्सवादग्रस्त व्यवहारांसाठी स्वतंत्र दोन सायकल्स सुरू करण्यात आल्या आहेत. पहिली डिसप्युट सायकल (DC1) मध्यरात्रीपासून दुपारी ४ वाजेपर्यंत राहील, तर दुसरी (DC2) दुपारी 4 ते मध्यरात्रीपर्यंत चालेल. या सायकल्समध्ये केवळ वादग्रस्त व्यवहारांचीच प्रक्रिया केली जाईल. एनटीएसएल (NTSL) फाईलमध्ये DC1 आणि DC2 अशी ओळख दर्शवली जाईल. इतर सर्व नियम जसे की वेळापत्रक, रिपोर्टिंग किंवा जीएसटी संबंधित प्रक्रिया यांत कोणताही बदल केलेला नाही.

बदलांमुळे अनेक फायदे होणार!

या बदलांमुळे अनेक फायदे अपेक्षित आहेत. सर्वात मोठा फायदा म्हणजे सामान्य व्यवहार आणि वादग्रस्त व्यवहार वेगळे केल्यामुळे सेटलमेंट प्रक्रिया जलद पूर्ण होईल. त्यामुळे ग्राहकांचा अनुभव अधिक सुलभ आणि विश्वासार्ह बनेल. बँका आणि फिनटेक कंपन्यांना त्यांच्या सेवांचा विस्तार करण्याची संधी मिळेल. विशेषतः ‘क्रेडिट ऑन यूपीआय’, ‘खरेदी करा आणि नंतर भरा’ आणि ईएमआय सारख्या योजनांमध्ये गती येईल.

युपीआयच्या माध्यमातून महिन्याला 16 अब्ज व्यवहार

द डिजिटल फिफ्थचे संस्थापक आणि सीईओ समीर सिंग जैन म्हणाले, “यूपीआय दरमहा 16 अब्ज व्यवहार हाताळते आणि 2030 च्या अखेरीस ते 3 पट वाढण्याचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत मजबूत पायाभूत सुविधांची भूमिका अत्यंत महत्त्वाची बनते.” त्यांनी पुढे सांगितले की, रिअल-टाइम फसवणूक शोधणे, क्लाउड-नेटिव्ह आर्किटेक्चर आणि स्केलेबल, ड्युअल-कोर स्विच आता पर्यायी राहिलेले नाहीत तर सुरक्षित आणि अपयशी ठरू शकणारे डिजिटल पेमेंट सुनिश्चित करण्यासाठी ते आवश्यक आहेत.


About Author

Rohit Shinde

Other Latest News