Credit Score : जर तुम्ही कर्ज किंवा क्रेडिट कार्ड घेण्याचा विचार करत असाल, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आली आहे. RBI ने क्रेडिट स्कोअरच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत, ज्याचा थेट फायदा सर्वसामान्यांना होईल. पूर्वी, तुमचा CIBIL किंवा क्रेडिट स्कोअर अपडेट होण्यासाठी 30 ते 45 दिवस लागायचे, परंतु नवीन नियमांमुळे ही प्रक्रिया खूप जलद होईल. आता 2026 पासून क्रेडिट स्कोर दर आठवड्याला अपडेट केला जाईल.
नव्या नियमानुसार आता क्रेडिट स्कोअर एका महिन्यात दोन वेळा अपडेट करण्याऐवजी दर सात दिवसानंतर अपडेट केला जाणार आहे. हा बदल आरबीआयच्या ड्राफ्ट क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्टिंग (प्रथम दुरुस्ती ) निर्देश 2025 नुसार लागू केला जाणार आहे. या प्रस्तावानुसार सर्व क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्यांना एका महिन्यात पाचवेळा कर्जदाराची माहिती अपडेट करावी लागेल. यासाठीच्या तारखा दर महि्याच्या 7, 14, 21, 28 आणि महिन्याचा शेवटचा दिवस अशा असतील.

सामान्य माणसाला कसा फायदा होईल? Credit Score
कर्ज मिळण्यास सोपे:
जर तुम्ही तुमचे जुने कर्ज फेडले असेल, तर तुमच्या CIBIL अहवालात ही माहिती दिसण्यासाठी पूर्वी १-२ महिने लागत होते, ज्यामुळे नवीन कर्ज मिळण्यास उशीर होत होता. आता, ही माहिती १५ दिवसांच्या आत अपडेट केली जाईल, ज्यामुळे तुमचा स्कोअर लगेच सुधारेल आणि तुम्हाला नवीन कर्ज मिळण्यास मदत होईल. Credit Score
जलद सुधारणा:
कधीकधी, क्रेडिट अहवालांमध्ये चुकीची माहिती (जसे की चुकीची थकबाकी रक्कम) दिसून येते. १५ दिवसांच्या अपडेट सायकलमुळे या चुका लवकर दुरुस्त करता येतील.
डिफॉल्टर्सची ओळख:
हा नियम बँकांसाठी देखील फायदेशीर आहे. जर एखादी व्यक्ती एका बँकेत डिफॉल्ट झाली आणि दुसऱ्या बँकेकडून कर्जासाठी अर्ज केला, तर दुसऱ्या बँकेला १५ दिवसांच्या आत कळेल की ती व्यक्ती डिफॉल्टर आहे.