मोदी सरकारने नुकतंच GST मधील कर रचनेत बदल केला आहे. आधी असलेल्या जीएसटीच्या (New GST Rate) चार स्लॅबपैकी 12 टक्के आणि 28 टक्क्यांचा स्लॅब रद्द करण्यात आला असून आता फक्त ५% आणि १८% असे दोनच स्लॅब टॅक्स असतील. खास करून अनेक जीवनावश्यक वस्तूंवरील टॅक्स सरकारकडून कमी करण्यात आला आहे…. यामध्ये साबण, अगरबत्ती, हेअर ऑइल यासारख्या वस्तूंचा समावेश आहे…..
मित्रांनो आपल्यापैकी अनेक जण दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू खास करून डी मार्ट मधून खरेदी करत असाल…. येथे किराणा, कपडे, ब्युटी प्रॉडक्ट, इलेक्ट्रॉनिक वस्तू सार काही स्वस्तात खरेदी करता येते. एकाच छताखाली सर्व वस्तू देणारे डी मार्ट आपल्या प्रत्येक वस्तूंवर कोणता ना कोणता डिस्काउंट देतच असते. परिणामी ग्राहक वर्ग मोठ्या प्रमाणात डी मार्ट कडे आकर्षित होतो. त्यातच आता भर म्हणजे केंद्र सरकारने ज्या वस्तूंवरील टॅक्स कमी केला आहे त्यातील बहुतांश वस्तू तुम्ही डी मार्ट मधूनही खरेदी करू शकता. म्हणजेच काय आता डी मार्ट मध्ये या वस्तू तुम्हाला आधीपेक्षा सुद्धा कमी किमतीत उपलब्ध होऊ शकतात…..
डी मार्ट मधील कोणकोणत्या वस्तू स्वस्तात मिळणार?? D Mart
केंद्र सरकारने रोजच्या वापरातील साबण, हेअर ऑईल, टूथपेस्ट, टॉयलेट क्लीनर, डिटर्जंट, धूप, अगरबत्ती आणि मेणबत्त्यांवरील जीएसटी दर 18 टक्क्यांवरून थेट 5 टक्क्यांवर आणला आहे. चहा, कॉफी आणि दूध पावडर यांसारख्या दैनंदिन गरजेच्या वस्तू 12 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर आल्या आहेत.
चॉकलेट्स, मिठाई, बिस्किटे, आईस्क्रीम, नमकीन तसेच सॉफ्ट ड्रिंक्सवर देखील करकपात झाली आहे. या वस्तू डीमार्टमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जात असल्याने ग्राहकांना याचा थेट फायदा होणार आहे.
इलेक्ट्रॉनिक वस्तू ही कमी किमतीत मिळतील
याशिवाय मिक्सर, ग्राइंडर यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील जीएसटी 28 टक्क्यांवरून 18 टक्के केला आहे… या वस्तू तुम्ही डी मार्ट मधून खरेदी करू शकाल….





