Diwali 2025 : दिवाळी बोनसचा योग्य उपयोग कसा कराल? किती शॉपिंग कराल आणि किती गुंतवणूक?

दिवाळी बोनसचा योग्य वापर कसा करावा, हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

मुंबई – प्रत्येक वर्षी दिवाळीत अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस देतात. हा बोनस अनेकांसाठी दिवाळीसारखअया सणात महत्त्वाचा असतो, त्यामुळे आनंदात भरच पडते. अनेकांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी या बोनसमुळे संधीही निर्माण होते.

मात्र अनेकदा होतं असं की बोनसची रक्कम हाती आली की अनेक जणं शॉपिंग, नव्या वस्तू खरेदी करण्यासाठी आणि चैन करण्यासाठी या पैशांचा वापर करतात. यामुळे नव्या वस्तूचा किंवा चैनेचा आनंद काही काळासाठी टिकतो मात्र दीर्घकालासाठी ही रक्कम अनेकांच्या कामी येत नाही.

त्यामुळेच दिवाळी बोनसचा योग्य वापर कसा करावा, हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

बोनसची वाटणी कशी कराल?

दिवाळी बोनसचा योग्य उपयोग तुमच्या अवश्यक गरजांवर अवलंबून असतो. योग्य पद्धत ही आहे की आलेल्या बोनसच्या रकमेची विभागणी तीन भागात करा. यात खर्च, बचत आणि गुंतवणूक आणि तिसरा भाग तुमच्या छोट्या सुखासाठी ठेवा. यामुळे सणाचा आनंदही तुम्ही घेऊ शकाल आणि तुमची आर्थिक स्थिरता यातून अधिक चांगली होईल.

दिवाळी बोनसचा पहिल्यांदा उपयोग कुठे कराल ?

जर तुमच्यावर एखादं कर्ज असेल तर ते चुकतं करण्यासाठी या पैशांचा वापर करणं हे सर्वाधिक चांगलं आहे. त्यामुळे व्याजाचं ओझं कमी होईल.

यानंतर उरलेला दुसरा भाग हा बचत आणि गुंतवणुकीसाठी उपयोगात आणायला हवा. यात सोनं, म्युचअल फंडस आणि फिक्स्ड डिपॉझिटसारखे पर्याय आहेत. यामुळे भविष्यासाठी सुरक्षित रकमेची तरतूद यानिमित्तानं करता येईल

सणासुणीचा आनंद घेणंही गरजेचं आहे, त्यामुळे बोनसचा तिसरा भाग हा कपडे खरेदी आणि कुटुंबावरही खर्च करा.


About Author

Smita Gangurde

Other Latest News