GST Cut : जीएसटीत कपात केल्यानंतर कार आणि एसयूव्ही गाड्या स्वस्त झाल्या आहेत. कार आणि लक्झरी कारच्या किमती 65 हजार ते 8 लाखांनी स्वस्त झाल्या आहेत. तर बीएमडब्ल्यू, मर्सिडिज बेंझच्या किंमतीही 60 हजार ते 11 लाखांनी स्वस्त होणार असल्याचं सांगितलं जात आहे. टाटाच्या गाडीच्या किमतीही सुमारे एका लाखांनी कमी होतील. मिळालेल्या माहितीनुसार, 22 सप्टेंबरपासून नवे दर लागू होणार आहेत. यानंतर तुम्ही गाडी बुक करू शकता. आणि दसरा-दिवाळीत गाडी घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचा दिवाळी-दसऱ्याला नवी कोरी कार घरात आणा.
कार, लक्झरी कार किती स्वस्त?
महिंद्रा

१.महिंद्रा बोलेरो निओ- 1.27 लाख रुपयांनी स्वस्त
२. एक्सयूव्ही 3 एक्सो पेट्रोल – 1.40 लाखांनी स्वस्त
३. एक्सयूव्ही 3 एक्सो डिझेल- 1.56 लाखांनी स्वस्त
४. थार रेंज- 1.35 लाखांनी स्वस्त
५. रॉक्स- 1.33 लाखआंनी स्वस्त
६. स्कॉर्पिओ क्लासिक – 1.01 लाखांनी स्वस्त
७. स्कॉर्पिओ एन 1.45- 1.43 लाखांनी स्वस्त
८. एक्सयूव्ही 700- 1.43 लाखांनी स्वस्त
मारुती सुझुकी
१. अल्टो के 10- 40 हजारांनी स्वस्त
२. वॅगन आर- 578 हजारांनी स्वस्त
३. स्विफ्ट- 58 हजारांनी स्वस्त
४. डिझायर – 61 हजारांनी स्वस्त
५. बलेनो- 60 हजारांनी स्वस्त
६. फ्रँक्स- 68 हजारांनी स्वस्त
७. ब्रेझा- 78 हजारांनी स्वस्त
८. एक्स एल 6- 35 हजारांनी स्वस्त
टाटा-टोयाटो
१. टियागो – 75 हजारांनी स्वस्त
२. टिगोर – 80 हजारांनी स्वस्त
३. अल्ट्राझ- 1.10 लाखांनी स्वस्त
४. पंच- 85 हजारांनी स्वस्त
५. नेक्सॉन – 1.55 लाखांनी स्वस्त
६. हॅरिअर- 1.40 लाखांनी स्वस्त
७. सफारी – १.45 लाखांनी स्वस्त
८. कर्व्ह- 65 हजारांनी स्वस्त
९. टोयटो फॉर्च्युनर – 3.49 लाखांनी स्वस्त
१०. लिजेंडर- 3.34 लाखांनी स्वस्त
११. हायलक्स – 2.52 लाखांनी स्वस्त
१२. वेलफायर – 2.78 लाखांनी स्वस्त
१३. कॅमरी- 1.01 लाखांनी स्वस्त
१४. इनोव्हा क्रिस्टा- 1.80 लाखांनी स्वस्त
१५. इनोव्हा हायक्रॉस- 1.15 लाखांनी स्वस्त
१६. रेनॉल्ट किगर – 96 हजारांनी स्वस्त