MP Breaking News
Sun, Dec 21, 2025

महत्वाची बातमी! सलग तीन दिवस बँका बंद राहणार; आता थेट सोमवारी बँकेतील कामे करा!

Written by:Rohit Shinde
Published:
Last Updated:
8 ऑगस्टला नारळी पौर्णिमा, 9 ऑगस्टला रक्षाबंधन आणि 10 ऑगस्टला रविवारची साप्ताहीक सुट्टी आहे. त्यामुळे काही राज्यांमध्ये बँका बंद राहाणार आहेत.
महत्वाची बातमी! सलग तीन दिवस बँका बंद राहणार; आता थेट सोमवारी बँकेतील कामे करा!

बँकेतील जर तुमची काही कामे पेंडींग असतील तर आता ही कामे थेट सोमवारी पूर्ण करता येणार आहेत. कारण, आता उद्यापासून सलग तीन दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. म्ही या आठवड्यात बँकेची कामे करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. ऑगस्ट महिन्यात अनेक सण आणि राष्ट्रीय उत्सव असल्यामुळे या आठवड्यात बँका बंद राहणार आहेत. 8 ऑगस्टला नारळी पौर्णिमा, 9 ऑगस्टला रक्षाबंधन आणि 10 ऑगस्टला रविवारची साप्ताहीक सुट्टी आहे. त्यामुळे काही राज्यांमध्ये बँका बंद राहाणार आहेत.

तीन दिवस कामकाज राहणार बंद!

देशातील बहुतांश राज्यांतील बँकांमध्ये शनिवार आणि रविवार सुट्टीचा दिवस असतो. तर उद्या काही बँकांना नारळी पौर्णिमेनिमित्त सुट्टी असणार आहे. उद्या काही बँकांचे कामकाज चालू देखील असू शकते. आवश्यकतेनुसार आपण बँकेच्या जवळीला शाखेला भेट देऊ शकता. 8 ऑगस्ट, शुक्रवारी सिक्कीममध्ये ‘तेन्दोंग ल्हो रुम फाट’ या पारंपरिक सण साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे बँका बंद राहतील. हा सण ‘लिंबू’ समुदायाकडून मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. त्यामुळे त्या राज्यात बँका बंद असतील.

9 ऑगस्ट, शनिवारी बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा सण अर्थात रक्षाबंधन असल्यामुळे देशातील काही राज्यांमध्ये बँका बंद राहतील. याशिवाय, महिन्याचा दुसरा शनिवार असल्यामुळे देशभरातील बँका बंद राहतील. 10 ऑगस्ट, रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने देशभरातील सर्व बँका बंद राहतील. रविवारी साधारणपणे देशातील खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील सर्वच बँका बंद राहतात.

ऑनलाईन, नेट बँकिंगचे पर्याय वापरा!

बँका बंद असल्या तरी ऑनलाईन आणि नेट बँकिंगचे पर्याय वापरून तुम्ही बरीचशी कामे पूर्ण करू शकता.आजकाल नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगमुळे पैसे ट्रान्सफर करणं सोपं झालं आहे. तरीही काही कामे अशी असतात, की जी बँकेच्या शाखेत गेल्याशिवाय पूर्ण होत नाहीत. त्यात KYC अपडेट करणे, रोख रक्कम जमा करणे किंवा काढणे, जॉईंट खाते उघडणे किंवा बंद करणे. या कामांसाठी तुम्हाला बँकेत जावंच लागतं. त्यामुळे बँकांच्या सुट्ट्या लक्षात घेऊनच तुमच्या कामाचं नियोजन करा. अथवा येत्या सोमवारी तुम्हाला बँकेतील पेंडींग कामे मार्गी लावता येतील.