मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत उद्योजक आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की, भारतातील सर्वात महागडी कार मुकेश अंबानी यांच्याकडे नाही, तर त्यांच्या पत्नी आणि यशस्वी उद्योजिका नीता अंबानी यांच्याकडे आहे.
बहुतेक लोकांना वाटतं की भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणजेच मुकेश अंबानी यांच्याकडे ही कार असणार, पण तसं नाही. चला तर मग, या कारचे फीचर्स आणि तिच्या दमदार इंजिनबाबत माहिती घेऊया.
अंबानी कुटुंबाकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. पण देशातील सर्वात महागडी गाडी म्हणून Audi A9 Chameleon ला ओळखलं जातं. या कारच्या मालकीण नीता अंबानी आहेत.
नीता अंबानींकडेच देशातील सर्वात महागडी कार आहे, ज्याची किंमत सुमारे 100 कोटी रुपये आहे. रिपोर्ट्सनुसार, ऑडीची ही कार सुमारे 600 हॉर्सपॉवरच्या जबरदस्त इंजिनसह बाजारात उपलब्ध आहे.
गाडीमध्ये कोणते खास फीचर्स आहेत?
ऑडी A9 Chameleon या कारच्या वैशिष्ट्यांकडे पाहिल्यास, तिची सर्वात खास बाब म्हणजे कारचा रंग फक्त एका बटणाच्या मदतीने बदलता येतो. या कारसाठी पेंट स्कीम इलेक्ट्रिक तंत्रज्ञानावर आधारित तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण जगभरात अशा फक्त 11 गाड्याच विकल्या गेल्या आहेत.
Audi A9 Chameleon चे इंजिन कसे आहे?
Audi A9 Chameleon मध्ये कंपनीने 4.0 लिटरचे V8 इंजिन दिले आहे. हे इंजिन 600 एचपीची मॅक्स पॉवर जनरेट करते. या कारमध्ये फक्त दोन दरवाजे दिले आहेत आणि तिची लांबी सुमारे 5 मीटर आहे.
इतकेच नाही, या कारचे विंडशील्ड आणि रूफ दोन्ही एकत्रितपणे इंटीग्रेट करण्यात आले आहे. याशिवाय, या लक्झरी कारमध्ये अनेक अत्याधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत, जे इतर कोणत्याही कारमध्ये पाहायला मिळत नाहीत.





