नवी दिल्ली- भारतात आता इंग्लंडच्या कार, व्हिस्की, कपडे आणि पादत्राणं स्वस्त होणार आहेत. 24 जुलैला भारत आणि इंग्लंडमध्ये मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. 2022 पासून या विषयावर चर्चा सुरु होती.
आता भारतातून इंग्लंडमध्ये आयात करण्यात येणाऱ्या 99 टक्के वस्तूंवर शून्य टेरिफ म्हणजेच आयात शुल्क असेल. तर इंग्लंडमधून आयात होणाऱ्या 99 टक्के वस्तूंवर साधारणपणे 3 टक्के आयात शुल्क आकारण्यात येईल. या करारामुळे 2030 पर्यंत द्वपक्षीय व्यापार दुप्पट होऊन 120 मिलियन डॉलर्सवर पोहचण्याची शक्यता आहे.
मोदींच्या इंग्लंड दौऱ्यात ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या
भारताचे वाणिज्यमंत्री पियूष गोयल आणि ब्रिटनचे व्यापारमंत्री जोनाथन रेनॉल्ड्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कीर स्टार्मर यांच्या उपस्थितीत या करारावर सह्या केल्या. या करारामुळे भारतात इंग्लंडच्या अनेक वस्तू आगामी काळात स्वस्त दरात मिळतील.
इंग्लंडमधून आयात होणाऱ्या वस्तूंवरील कर 15 टक्क्यांनी घटवून तो आता 3 टक्के करण्यात आला आहे. त्यातील 85 टक्के वस्तू 10 टक्के पूर्णपणे करमुक्त असतील. याचा फायदा भारतीयांना होणार आहे.
कोणत्या वस्तू स्वस्त होणार?
1. इंग्लंडमधून आयात होणारी स्कॉच व्हिस्की आणि जिनवरील टेरिफ दर 150 टक्क्यांवरुन 75 टक्के होतील. करारानुसार दहाव्या वर्षापर्यंत हा कर घटवून 40 टक्क्यांपर्यंत करण्यात येणार आहे. यामुळे 5000 रुपयांची स्कॉचची बाटली आता 3500 रुपयांपर्यंत मिळेल
2. इंग्लंडमधील लक्झरी कार असलेल्या जग्वार लँड रोव्हर, रोल्स रॉईस यावरील आयात कर 100 टक्क्यांवरुन 10 टक्के करण्यात आलाय. त्यामुळे या कार देशात 20 ते 30 टक्क्यांनी स्वस्त होतील.
3. इंग्लंडमधून आयात होणारे मासे, मेंढी, बिस्किटं, सॉफ्ट ड्रिंक यांच्यावरील टेरिफही कमी करण्यात आलाय. या वस्तूही भारतात स्वस्त मिळतील.
4. इंग्लंडमधून भारतात येणारी कॉस्मेटिक उत्पादनं, वैद्यकीय उपकरणं, एयरोस्पेसचे पार्ट हेही स्वस्त होणार आहेत.
5. इंग्लंडमधून भारतात येणारे ब्रॅंडेड कपडे, फॅशन प्रोडक्ट्स, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूही स्वस्त होणार आहेत.
भारतातून आयात होणाऱ्या कोणत्या वस्तूंना फायदा?
1. प्रोसेस फूड
2. व्हेजिटेबल ऑईल
3. ऑटो ट्रान्सपोर्ट
4. लेदर, बूट
5. इलेक्ट्रिक मशिन
6. ग्लास, सिरॅमिक
7. लाकूड, पेपर
8. बेस मेटल
9. मॅकेनिकल मशिन
10. मिनरल्स, केमिकल्स
11. प्लास्टिक, रबर
12. घड्याळं
13. फर्निचर, खेळणी
14. हत्यारं





