देशातील सर्वात सुरक्षित 3 बँका कोणत्या ? तुमच्या प्रश्नाचे थेट RBI कडून उत्तर

Rohit Shinde

देशातील सुरक्षित बँका कोणत्या ? हा सर्वसामान्यांना पडणारा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण, आपली बचत, गुंतवणूक आणि दैनंदिन आर्थिक व्यवहार किती सुरक्षित आहेत, याचा थेट संबंध बँकेच्या स्थिरतेशी असतो. आरबीआय वेळोवेळी बँकांच्या आर्थिक स्थितीचे परीक्षण करून त्यांची विश्वसनीयता जाहीर करते. अशीच टॉप तीन सुरक्षित बँकांची घोषणा नुकतीच आरबीआयने केली आहे.

देशातील सर्वात सुरक्षित 3 बँका कोणत्या ?

भारतात अनेक बँका आहेत, यातील काही सरकारी बँका आहेत तर काही खाजगी बँका आहेत. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांचे बँकेत पैसे असतील. मात्र अनेकांना नेहमी भीती असते की आपले पैसे सुरक्षित आहेत की नाहीत. अशातच आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील सर्वात सुरक्षित असणाऱ्या 3 बँकांची माहिती दिली आहे. देशातील सर्वात सुरक्षित बँका म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), HDFC बँक आणि ICICI बँकांची नावे जाहीर केली आहेत. बँकिंग भाषेत या बँकाना “डोमेस्टिक सिस्टिमिकली इम्पॉर्टंट बँक्स” (D-SIBs) म्हणतात. या तीन बँका भारतीय अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत त्या बुडणार नाहीत किंवा दिवाळखोर होणार नाहीत असं आरबीआयने म्हटलं आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार, या तिन्ही बँकांना इतर बँकांपेक्षा जास्त रोख राखीव निधी किंवा भांडवल जवळ ठेवावे लागते. याला ‘कॉमन इक्विटी टियर 1’ (CET 1) असे म्हणतात. हा आपत्कालीन निधी आहे जो संकटाच्या वेळी वापरता येतो. त्यामुळे या बँकांच्या कामकाजावर परिणाम होत नाही किंवा नागरिकांच्या पैशांवर गदा येत नाही. त्यामुळे या बँकांमध्ये पैसे असणे सर्वात सुरक्षित मानले जाते. त्यामुळे तुमचे जर पैसे या तीन बँकांमध्ये असतील तर तुम्ही निश्चिंत राहायला हरकत नाही.

कष्टाने कमावलेला पैसा सुरक्षित कसा ठेवायचा ?

कष्टाने कमावलेला पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी काही महत्वाच्या उपायांचा अवलंब करणे आवश्यक आहे. प्रथम, विश्वासार्ह आणि आरबीआय मान्यताप्राप्त बँकांमध्ये खाते ठेवणे सुरक्षित असते. बचत विविध ठिकाणी ठेवावी. बँक खाते, एफडी, आरडी, किंवा सुरक्षित गुंतवणूक साधने यामुळे जोखीम कमी होते. डिजिटल व्यवहार करताना ओटीपी, पासवर्ड किंवा यूपीआय पिन कोणाशीही शेअर करू नये. संशयास्पद कॉल, मेसेज किंवा लिंकपासून दूर राहावे. मोठी रक्कम घरी न ठेवता लॉकर्स किंवा बँकिंग सेवांचा वापर करावा. विमा कवच घेणेही उपयुक्त ठरते. आर्थिक फसवणुकीपासून वाचण्यासाठी नेहमी अधिकृत अॅप्स, संकेतस्थळे आणि सुरक्षित नेटवर्कच वापरावे. असे उपाय घेतल्यास पैसा सुरक्षित राहू शकतो.

ताज्या बातम्या