MP Breaking News
Thu, Dec 18, 2025

देशातील सर्वात श्रीमंत कुटुंब अंबानींचं, व्यापाराचं मूल्यांकन 28 लाख कोटींचं

Written by:Smita Gangurde
Published:
Last Updated:
देशातील सर्वात श्रीमंत कुटुंब अंबानींचं, व्यापाराचं मूल्यांकन 28 लाख कोटींचं

नवी दिल्ली – हुरुन इंडिया मोस्ट व्हॅल्यूएबेल फॅमिली बिझनेसेसच्या 2025 च्या लिस्टमध्ये सर्वात टॉपचं नाव आहे अंबानी परिवाराचं आहे. अंबानी परिवाराच्या व्यापाराचं मूल्यांकन 28 लाख कोटी रुपये इतकं मोठं आहे. भारताच्या एकत्रित जीडीपीच्या बारावा भाग अंबानी कुटुंबाच्या व्यापाराच्या मूल्यांकना इतका आहे.

या यादीत दुसरा क्रमांक कुमार मंगलम बिर्ला परिवारानं मिळवलेला आहे. बिर्ला कुटुंबाच्या व्यापाराचं मूल्यांकन 6.5 लाख कोटी रुपये इतकं आहे. जिंदाल परिवारानं तिसरं स्थान पटकावलंय. जिंदाल कुटुबांच्या व्यापाराचं मूल्यांकन 5.7 लाख कोटी रुपये इतकं आहे.

भारतातीत 10 श्रीमंत कुटुंब

1. अंबानी परिवार, रिलायन्स इंडस्ट्रीज, मूल्य 28.23 लाख कोटी
2. कुमार मंगलम बिर्ला परिवार, आदित्य बिर्ला ग्रुप, मूल्य 6.47 लाख कोटी
3. जिंदाल परिवार, जेएसडब्ल्यू ग्रुप, मूल्य 5.70 लाख कोटी
4. बजाज कुटुंब, बजाज ग्रुप, मूल्य 5.64 लाख कोटी
5. महिंद्रा कुटुंब, महिंद्रा अॅन्ड महिंद्रा, मूल्य 5.43 लाख कोटी
6. नादर कुटुंब. एचसीएल टेक्नोलॉजी, मूल्य 4.68 लाख कोटी
7. मुरुगप्पा कुटुंब, चोलामंडलम इन्व्हेस्ट कं, मूल्य 2.92 लाख कोटी
8. प्रेमजी कुटुंब, विप्रो, मूल्य 2.78 लाख कोटी
9. अनिल अग्रवाल कुटुबं, हिंदूस्थान झिंक, मूल्य 2.55 लाख कोटी
10. दामी कुटुंब. चोकसी कुटुंब, एशियन पेंट्स, मूल्य 2.20 लाख कोटी

 

फर्स्ट जनरेशन फॅमिलि बिझनेसमध्ये अदानी पहिल्या नंबरवर

गौतम अदानी यांच्या अदानी ग्रुपनं फर्स्ट जनरेशन फॅमिली बिझनेसमध्ये बाजी मारली आहे. त्यांच्या व्यापाराचं मूल्य 14 लाख कोटी रुपये इतकं आहे. दुसऱ्या क्रमांकावर पुनावाला परिवार आहे. त्यांच्या व्यापाराचं मूल्य 2.3 लाख कोटी इतकं आहे. तर दिवी परिवार तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्यांच्या व्यापाराचं मूल्य 1.8 लाख कोटी इतकं आहे.

टॉप 300 फॅमिली बिझनेसबाबत महत्त्वाच्या बाबी

यादीत 100 नव्या नावांच्या समावेशासह ही यादी 300 जणांची झाली आहे. या कुटुंबांच्या व्यापाराचं एकूण मूल्यांकन 1.6 ट्रिलियन म्हणजे 134 लाख कोटी रुपये इतकं मोठं आहे. तुर्की आणि फिनलँड या देशांच्या एकूण जीडीपीपेक्षाही हा आकडा मोठा आहे. यादीत असलेल्या टॉप 10 परिवारांकडे एकूण रकमेच्या 50 टक्के वाटा आहे.

ही 300 कुटुंब देशाच्या अर्थव्यवस्थेत दररोज 7100 कोटी रुपयांचं योगदान देतात. यासह देशाला दरवर्षी हे सर्वजण मिळून 1.8 लाख कोटींचा करही देतायेत.

यादीत इंडस्ट्रियल प्रोडक्ट्सच्या 48 कंपन्या, ऑटोमोबाईलच्या 29 कंपन्या, फार्माच्या 25 कंपन्यांचा समावेश आहे.