अभिनेत्री आणि माजी मिस इंडिया सेलिना जेटलीने आपला फॉरेनर पती पीटर हाग विरोधात घरगुती हिंसाचाराचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्रीने आपल्या पतीविरोधात 50 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा केला आहे. शिवाय तिचे वैवाहिक आयुष्य मोडीत निघाल्याची माहिती समोर येत आहे. एखाद्या कामवाल्या बाईप्रमाणे पीटर वागवत असल्याचं सेलिना म्हणाली आहे. आता 12 डिसेंबर 2025 रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार असून अभिनेत्रीने आता याबाबत पहिली पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
सेलिना जेटलीचे पतीवर गंभीर आरोप
तक्रारीत म्हटल्यानुसार, सेलिना हिने पीटरचं वर्णन असंवेदनशील आणि स्वार्थी असं केलं. तिचा आरोप आहे की त्याचा राग आणि मद्यपानामुळे त्यांचं वैवाहिक जीवन कठीण झालं होतं. कागदपत्रांमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार, तो तिच्या आर्थिक बाबींवर नियंत्रण मिळवण्यासाठी तिच्या असुरक्षिततेचा फायदा घेऊ इच्छित होता. सेलिना हिच्या आरोपांनुसार, इटलीमध्ये हनीमून दरम्यान , जेव्हा तिने आरोग्याच्या समस्यांबद्दल सांगितलं, तेव्हा पीटर रागावला, तिच्यावर ओरडला आणि भिंतीवर काचेचा ग्लास फेकला. अभिनेत्रीने सांगितलं की, तिला मासिक पाळीच्या क्रॅम्पचा त्रास होत होता.

तक्रारीत असं म्हटलं आहे की, पीटरने तिचे खाजगी फोटो काढले आणि नंतर तिने त्याच्या मागण्या पूर्ण न केल्यास ते फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. सेलिना हिने म्हटल्यानुसार, पीटर अभिनेत्रीवर काही अनैसर्गिक लैंगिक संबंधांसाठी दबाव आणत असे, ज्यामुळे तिला अस्वस्थ वाटत असे. सेलिना जेटलीचे सर्व आरोप कायदेशीर कागदपत्रांमध्ये दाखल केलेले आहेत आणि ते न्यायालयीन प्रक्रियेत आहेत. पीटर हाग याच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
पतीवर 50 कोटींच्या मानहानीचा दावा
सेलिना जेटली गेल्या अनेक दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. एकीकडे अभिनेत्रीची भाऊ निवृत्त मेजर विक्रांत कुमार जेटली गेल्या वर्षभरापासून UAE च्या तुरुंगात आहे तर दुसरीकडे अभिनेत्रीचा पतीपासून छळ होत आहे. सेलिनाने आपला पती पीटर हागवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आहे. अभिनेत्रीने आता पतीविरोधात घटस्फोटाची मागणी केली आहे. अशातच अभिनेत्रीने आता पोस्ट शेअर करत घटस्फोटाबद्दल मौन सोडलं आहे. मुंबई उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्रीने आपल्या पतीविरोधात 50 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा केला आहे. एखाद्या कामवाल्या बाईप्रमाणे पीटर वागवत असल्याचं सेलिना म्हणाली आहे. आता 12 डिसेंबर 2025 रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार असून अभिनेत्रीने आता याबाबत पहिली पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
Celina Jaitley filed for divorce after 14 years of marriage.
She has demanded:
– ₹50 crore compensation.
– ₹10 lakh monthly maintenance.What do you think – how much money does she actually deserve? pic.twitter.com/AxzbWBGaEP
— Nalini Unagar (@NalinisKitchen) November 28, 2025











