नवी दिल्ली– भारतासोबत झालेल्या टेरिफ वादानंतर आणि वाढीव टेरिफच्या निर्णयानंतर आता अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांनी भारताच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केलाय.
अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी जिलेल्या एका मुलाखतीत भारत आणि अमेरिकेच्या संबंधांवर भाष्य केलंय. या संबंधांत थोडा तणाव असला तरी दोन्ही देश एकत्रित येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. एका अर्थी टेरिफ वाढीनंतर भारताच्या जखमांवर मीठ चोळण्याचा हा प्रयत्न दिसतोय.

अमेरिकेकडून जाणीवपूर्वक टार्गेट
अमेरिकेनं भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 50 टक्के टेरिफ आकारण्याची घोषणा केलीय. ही घोषणा आजपासून लागू झाली आहे, संपूर्ण जगात इतका मोठा टेरिफ आकारण्यात येणारा भारत हा पहिलाच देश ठरलाय.
दुसरीकडे भारताच्या परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री कीर्तिवर्धन राठोड यांनी या प्रकरणात अमेरिकेच्या विरोधात प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिका जाणीवपूर्वक भारताला टार्गेट कण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
भारत रशियाकडून तेल खेरदी करतो यासाठी अमेरिकेनं टेरिफमध्ये वाढ करण्याची घोषणा केली, मात्र वास्तवात अमेरिकेसह जगातील अनेक देश हे रशियासोबत व्यापार करत असल्याचं यापूर्वीही भारतानं स्पष्ट केलेलं आहे.
परराष्ट्रमंत्र्यांच्या आव्हानालाही अमेरिकेचं उत्तर
अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी अमेरिका आणि भारताच्या ताणलेल्या परिस्थितीच्या प्रश्नाबाबत भाष्य केलंय. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेच्या या निर्णयाविरोधात वक्तव्य केलं होतं. रशियाकडून कच्चे तेल खरेदीवर जर अमेरिकेचा आक्षेप असेल, तर भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या रिफाईंड तेलावरही अमेरिकेनं बंदी आणावी, असं एस जयशंकतर म्हणाले होते.
यावर अमेरिकेचे अर्थमंत्री बेसेंट यांनी प्रतिक्रिया दिलीय. भारत हा लोकशाहीतील सर्वात मोठा देश आहे. तर अमेरिका ही सर्वात मोठी अर्थव्यवस्था असल्याचंही त्यांनी सांगितलंय. भविष्यात दोन्ही देश एकत्रित समोर येतील असं भाष्यही त्यांनी केलंय.
रुपयाला जागतिक करन्सीची चिंता नाही- बेसेंट
ट्रम्प यांच्या भूमिकेचं समर्थन बेसेंट यांनी केलंय. ज्यावेळी व्यापारात असमतोल असतो, त्यावेळी तोट्यात असलेला देश या संधीचा फायदा घेतो. यात जास्त विक्री करणाऱ्या देशांनी चिंता करण्याची गरज असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलंय. बेसेंट यांनी पुढे सांगितलं की भारत आम्हाला वस्तू विकतो, मात्र अमेरिकेतून जाणाऱ्या वस्तूंवर भारतात जास्त आयातकर आहे.
ज्यावेळी बेसेंट यांना भारतीय रुपयाच्या घसरणीबाबत प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी त्यांनी सांगितलं की अमेरिकन डॉलरच्या तलनेत भारतीय रुपया अत्यंत खालच्या स्तरावर आहे. यावर भारतानं चिंता करण्याची गरज नाही असंही अमेरिकन अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. भारतातून निर्यात होणाऱ्या अनेक गोष्टींबाबत चिंता आहे, मात्र रुपयाच्या घसरणीवर नाही, हेही त्यांनी स्पश्ट केलंय.











