Air India चा बंपर सेल, १३,३०० रुपयात इंटरनॅशनल राऊंड ट्रिप, कसं बुक कराल; शेवटची तारीख काय?

Smita Gangurde

Air India sale : एअर इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आणली आहे. देशातील फ्लॅग कॅरियर एअरलाइनने २ सप्टेंबर २०२५ पासून आपल्या इंटरनॅशनल फ्लाइटवर स्पेशल सेलची घोषणा केली आहे. या लिमिटेड-पीरियड ऑफरअंतर्गत निवडत शॉर्ट-हॉल मार्गावर प्रिमियम इकॉनॉमी तिकिटांची किंमत राऊंड ट्रिपसाठी केवळ १३,३०० रुपयांपासून सुरुवात होईल, कर बिजनेस क्लासचं तिकीट ३४,४०० रुपयांपासून सुरू होईल.

जे पर्यटक दक्षिण आशिया, दक्षिण पूर्व आशिया आणि मध्य पूर्व या देशांमध्ये जाण्याचा प्लान करीत आहे, त्यांना या ऑफरचा फायदा होईल. हा सेल २ सप्टेंबरपासून ७ सप्टेंबरपर्यंत असेल आणि बुक केलेले तिकीट ३१ मार्च २०२६ पर्यंत वैध असतील.

काय फायदा मिळेल?

एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, जे ग्राहक त्यांच्या वेबसाइट किंवा मोबाईल अॅपवरून थेट तिकिटं बुक करतील त्यांना अतिरिक्त बचत मिळेल. या कालावधीत कोणतेही सुविधा शुल्क आकारले जाणार नाही. याशिवाय, FLYAI प्रोमो कोड वापरल्यास प्रति प्रवासी २,४०० रुपयांपर्यंत सूट मिळेल. VISA कार्डद्वारे पेमेंट केल्यास, VISAFLY प्रोमो कोड वापरल्यास २,५०० रुपयांपर्यंत सूट मिळेल.

बुकिंग कुठून कराल?

एअर इंडियाची वेबसाइट, मोबाइल अॅप, एअरपोर्ट तिकिट ऑफिस, कस्टमर सर्विस सेंटर आणि ट्रॅव्हल एजेंटकडून बुक करू शकता. हा सेल ७ सप्टेंबर या शेवटच्या दिवशी एअर इंडियाची वेबसाइट आणि अॅपवर मिळेल.

मर्यादित जागा

या ऑफरअंतर्गत जागा अत्यंत मर्यादित आहेत. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर उपलब्ध असतील. टॅक्स आणि एक्सचेंज दरांमुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये भाडे थोडे वेगळे असू शकते. त्यामुळे प्रवाशांना लवकर बुकिंग करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

 

ताज्या बातम्या