अमूल आणि मदर डेअरीच्या दुधाचा वापर करणारा ग्राहकवर्ग शहरी भागात मोठा आहे. दोन्ही दूध वितरक कंपन्या ग्राहकांना मोठा दिलासा देण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. केंद्र सरकारनं पॅकेज्ड दूधावरील 5 टक्के जीएसटी रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जीएसटी परिषदेनेही त्यास मान्यता दिली अमूल आणि मदर डेअरीकडून दूध खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. या दोन्ही मोठ्या ब्रँड्सनी दूध दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. खरंतर आगामी काळात 22 सप्टेंबरपासून हे नवे दर लागू होण्याची शक्यता यानिमित्ताने निर्माण झाली आहे.
जीएसटी बदलांचा दूध दरावर परिणाम
केंद्र सरकारनं पॅकेज्ड दूधावरील 5 टक्के जीएसटी रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जीएसटी परिषदेनेही त्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे 22 सप्टेंबरपासून अमूल आणि मदर डेअरीचं दूध 3 ते 4 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. सध्या अमूल गोल्ड या फुल क्रीम दुधाची किंमत प्रति लीटर 69 रुपये असून ती 65 ते 66 रुपयांपर्यंत येईल. अमूल फ्रेश टोंड मिल्क 57 रुपयांवरून 54 ते 55 रुपयांवर मिळणार आहे. अमूल टी स्पेशल दूध 63 रुपयांवरून 59 ते 60 रुपयांवर उपलब्ध होईल. म्हशीचं दूध 75 रुपयांवरून 71 ते 72 रुपयांवर, तर गायीचं दूध 58 रुपयांवरून 55 ते 57 रुपयांवर मिळणार आहे.
मदर डेअरीच्या दुधाच्या किंमतींमध्येही तशीच कपात होणार आहे. फुल क्रीम दूध 69 रुपयांवरून 65 ते 66 रुपयांवर, टोन्ड मिल्क 57 रुपयांवरून 55 ते 56 रुपयांवर, म्हशीचं दूध 74 रुपयांवरून 71 रुपयांवर आणि गायीचं दूध 59 रुपयांवरून 56 ते 57 रुपयांवर येणार आहे.
जीएसटी बदलांमुळे ग्राहकांना दिलासा
महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दूध आणि इतर दैनंदिन गरजेच्या वस्तू सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहाव्यात यासाठी जीएसटी स्लॅबमध्ये बदल केला आहे. आता 5 टक्के आणि 18 टक्के असे दोनच स्लॅब राहणार असून दूधावरील जीएसटी पूर्णपणे शून्यावर आणण्यात आला आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य ग्राहकांना थेट दिलासा मिळणार आहे. एकूणच जीएसटीचे ५ आणि १८ टक्के हे दोनच स्लॅब कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता ग्राहकांना मोठा दिलासा मिळताना यानिमित्ताने दिसत आहे.





