‘ढगांमध्ये वसलंय गाव, स्वर्गापेक्षा कमी नाही’; आनंद महिद्रा भारतातील कोणत्या भागात पोहोचलेत; Video केला शेअर

हे गाव कोणतं आहे आणि इथं कसं जाता येईल?

भारतातील अनेक ठिकाणं स्वर्गाहून सुंदर वाटावी अशी आहेत. विशेषत: भारतातील उत्तर पूर्वेकडील भाग. आता मेघालयातील ढगांमध्ये वसलेल्या या गावाचा व्हिडिओ समोर आला आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हालाही या गावात जाण्याची इच्छा होईल. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिद्रा यांनी या गावाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. याबाबत त्यांनी अधिक माहितीही दिली आहे. हे गाव कोणतं आहे आणि इथं कसं जाता येईल?

कुठे आहे हे गाव?

 

या गावाचं नाव नोंगज्रोंग आहे. हे गाव मेघालयाच्या पूर्वेकडील खासी डोंगररोगांवरील मावकिन्नेव तालुक्यात १०९४ मीटर उंचीवर स्थित आहे. या गावात साधारण १४४० गावकरी राहतात. येथे खासी आणि इंग्रजी भाषा बोलली जाते. शिंलाँगपासून साधारण ६० किलोमीटर दूर नोंगज्रोंग आजही मेघालयासाठी एखाद्या खजान्यापेक्षा कमी नाही. त्याची खासियत या दरीत आहे. पहाटेच्या वेळी या दरीमध्ये ढग जमा होऊ लागतात. ज्यामुळे सूर्योदयाचे एक अद्भुत दृश्य निर्माण होते. निसर्गाची किमया पाहायची असेल तर या गावी यायलाच हवं.

नोंगज्रोंगमध्ये काय काय पाहू शकाल?

नोंगज्रोंग व्यू पॉइंट

याचं मुख्य आकर्षण डोंगरीवरील व्यू पॉइंटमध्ये आहे. यासाठी थोडं चालावं लागतं. सूर्याचं पहिलं किरण या डोंगरावर पडताच वेगळंच दृश्य येथे पाहायला मिळतं.

नोंगज्रोंग धबधबा

गावापासून सुमारे ३ किमी अंतरावर घनदाट जंगलात असलेला नोंगज्रोंग धबधबा हा एक मनमोहून घेणारा धबधबा आहे. या शांत ठिकाणी एक छोटासा रस्ता जातो, जो पावसाळ्यात अधिकच मोहक बनतो.


उमंगोट नदीवर कायाकिंग

साधारण दहा किलोमीटरअंतरावर डॉकीजवळ उमंगोट नदीत कायाकिंग आणि राफ्टिंगचा प्लान जबरदस्त आहे. भारतातील सर्वात नदींपैकी एक मानली जाणारी ही नदी सतत धबधब्यासारखी वाहत राहते.

नोंगज्रोंगमध्ये कुठे थांबाल?

येथे येणारे अधिकतर पर्यटक होमस्टेमध्ये राहतात. येथे होमस्टेमध्ये लोकल फूडचा आस्वाद घेतला जातो. यानिमित्ताने तेथील संस्कृतीची ओळख होते.

नोंगज्रोंगला कसे पोहोचायचे?

विमान मार्गे: सर्वात जवळचे विमानतळ गुवाहाटीमधील लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ. येथून नोंगज्रोंग अंदाजे १०० किमी अंतरावर आहे आणि टॅक्सी किंवा बसने पोहोचता येते.

रेल्वे मार्गे: सर्वात जवळचे प्रमुख रेल्वे स्थानक गुवाहाटी रेल्वे स्थानक. तेथून टॅक्सी आणि बस सेवा उपलब्ध आहेत.

बस मार्गे: गुवाहाटीहून सरकारी आणि खाजगी बसने शिलॉंगला जाता येथे. येथून नोंगज्रोंगला पोहोचायला सुमारे २ तास लागतात. त्यामुळे गुवाहाटी ते शिलाँग आणि तेथून दोन तास नोंगज्रोंह अशा संपूर्ण प्रवासाला अंदाजे ४ तास लागतात.

कारने: कार भाड्याने घेणे हा सर्वात सोयीस्कर पर्याय आहे. नोंगज्रोंग शिलॉंगपासून दोन तासांच्या अंतरावर आहे. गुवाहाटीपासून १४४ किमीच्या प्रवासाला अंदाजे ५ तास लागतात.


About Author

Smita Gangurde

Other Latest News