Bhushan Gavai Attack : सरन्यायाधीश गवई यांच्यावरील हल्ल्यानंतर मोदींचं महत्वाच ट्विट

आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाने देशातील प्रत्येक नागरिक संतापला आहे. आपल्या समाजात अशा निंदनीय कृत्यांना स्थान नाही. ही घटना निषेधार्ह आहे असे मोदींनी म्हटल..

देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर आज एका वकिलानेच बूट फेकून हल्ला केल्यानंतर (Bhushan Gavai Attack) देशभरातील वातावरण चांगलंच गरम झालं. यावेळी या वकिलाने ‘सनातनचा अपमान सहन करणार नाही’ असा आरडाओरडा केला. संपूर्ण देशभरातून या घटनेवरून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. विरोधकांनी या घटनेनंतर भाजप वर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. आता खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याची दखल घेतली आहे. आपल्या समाजात अशा निंदनीय कृत्यांना स्थान नाही. ही घटना निषेधार्ह आहे असं मोदींनी म्हटलं.

काय म्हणाले मोदी? Bhushan Gavai Attack

याबाबत नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटलं की, भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्याशी मी बोललो. आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाने देशातील प्रत्येक नागरिक संतापला आहे. आपल्या समाजात अशा निंदनीय कृत्यांना स्थान नाही. ही घटना निषेधार्ह आहे. अशा परिस्थितीला तोंड देताना न्यायमूर्ती गवई यांनी दाखवलेल्या शांततेचे मी कौतुक करतो. त्यांचे कृत्य न्यायमूर्तींच्या मूल्यांप्रती आणि आपल्या संविधानाच्या आत्म्याला बळकटी देण्याप्रती त्यांची वचनबद्धता अधोरेखित करते.

नेमकं काय घडलं?

आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान एका वकिलाकडून सुनावणी दरम्यान भूषण गवई यांच्या वर बूट फेकण्याचा प्रयत्न झाला. सदर वकिलाने सुनावणी चालू असतानाच  मंचाच्याजवळ जाऊन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट काढून फेकण्याचा (Bhushan Gavai Attack) प्रयत्न केला. पण वेळीच  सुरक्षा  कर्मचाऱ्यांनी त्याला अडवलं. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वकिलाला कोर्टाबाहेर काढलं. यावेळी तो वकिल आरडाओरडा करत म्हटला, सनातनचा अपमान सहन करणार नाही. मात्र एवढे सगळे घडूनही भूषण गवई हे शांत होते. या सर्व गोष्टींमुळे विचलित होण्याची गरज नाही. आपण याने विचलित होत नाही. अशा गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही अशी प्रतिक्रिया सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिली..


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News