बिहार विधानसभा निवडणूक मतमोजणी; सुरूवातीचे कल समोर, एनडीएचं सरकार बनणार ?

बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळपासून सुरूवात झाली आहे. बिहारमध्ये सुरूवातीच्या कलांमध्ये एनडीएची बहुमताकडे वाटचाल सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

बिहारमध्ये सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. कारण, बिहारमध्ये एनडीएची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सध्या सुरू आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळपासून सुरूवात झाली आहे. बिहारमध्ये सुरूवातीच्या कलांमध्ये एनडीएची बहुमताकडे वाटचाल सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

बिहारमध्ये एनडीएची बहुमताकडे वाटचाल

बिहार विधानसभा निवडणूक 2025 चा आज, 14 नोव्हेंबर निकाल जाहीर होणार आहे. बिहारमधील 243 विधानसभा जागांसाठी मतमोजणी सुरु आहे आहे. सध्या बिहारमधील पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे. बिहार निवडणुकीच्या पहिल्या कलानूसार 243 विधानसभा पैकी बिहार निवडणुकीच्या निकालांसाठी ईव्हीएमची मोजणी आता सुरू झाली आहे. सुरुवातीला पोस्टल मतपत्रिका मोजण्यात आल्या होत्या. आता ईव्हीएम देखील उघडण्यात आल्या आहेत. आतापर्यंत बिहारमध्ये १४० जागांसाठी ट्रेंड आले आहेत. ट्रेंडमध्ये एनडीएने लक्षणीय आघाडी घेतली आहे.

सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये एनडीए ८८ जागांवर आघाडीवर आहे, तर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी ५१ जागांवर आघाडीवर आहे. छपरा येथे भाजपच्या छोटी कुमारी आघाडीवर आहेत, तर खेसारी लाल यादव पिछाडीवर आहेत. पटना येथे १४ पैकी ९ जागांवर एनडीए आघाडीवर आहे.

एनडीएची विजयोत्सवाची तयारी सुरू

बिहारमध्ये मतमोजणी पूर्ण होण्याआधीच विजयोत्सवाची तयारी सुरु आहे..नितीश कुमारांची बहिण इंदु कुमारी यांनी नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील असा विश्वास व्यक्त केलाय..नितीश कुमारांनी जनतेसाठी जे काम केलंय..त्याची भेट बिहारची जनता नितीश कुमारांना देणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय..भाजप नेते अजय अलोक यांनी विजयाचा दावा केलाय… दरम्यान बिहारच्या जनतेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नीतीश कुमार यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवलाय असं अजय अलोक म्हणालेत…

EVM उघडले आहेत. मात्र पोस्टल आणि बॅलेटपेपरच्या मतमोजणीमध्ये एनडीएने शतक पार केलं आहे. तर महागठबंधनला मोठा धक्का बसला आहे. नामांकीत जागांवर एनडीएच्या नेत्यांनी आघाडी घेतली आहे. खेसरीलाल मात्र अजूनही पिछाडीवर आहेत. EVM पावणार का ते पाहावं लागणार आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News