बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. लाडकी बहीण योजनेचा मोठा फायदा एनडीएला झाला असून एकहाती सत्ता मिळतेय. महाराष्ट्र पॅटर्नचा बिहारमध्ये फायदा झाला. सध्यस्थितीला एनडीएचे उमेदवार 202 तर महागठबंधनचे उमेदवार अवघ्या 35 जागांवर आघाडीवर दिसत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे प्रशांत किशोर यांना अपयश आल्याचे दिसते. त्यामुळे आता बिहारमध्ये नितीश कुमारांच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार स्थापन होणार ही बाब जवळपास स्पष्ट झाली आहे.
बिहारमध्ये भाजप, जदयुला प्रचंड मोठं यश
बिहारमध्ये सत्ता मिळवण्यासाठी अनेक पक्ष प्रयत्न करताना दिसली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणे बदलली. आता बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास पुढे आली असून एनडीएला बहुमत मिळतंय. एकहाती सत्ता एनडीएची असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा बघायला मिळाला.

90 विधानसभेवर भाजपा उमेदवार सुरूवातीपासूनच आघाडीवर बघायला मिळाली. बिहारमध्ये मतदानाचा एक नवीन विक्रम प्रस्थापित झाला. त्याचा थेट फायदा एनडीएला झाल्याचे बघायला मिळाले. दोन्ही टप्प्यांमध्ये एकत्रित 66.90 टक्के मतदान झाले, जे 2020 च्या तुलनेत 9 टक्के जास्त होते. बिहारमध्ये एनडीए सरकार स्थापन करणार असल्याचे स्पष्ट आहे. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला असून नंबर दोनचा पक्ष जेडीयू ठरला असून जेडीयूने मुख्यमंत्रिपदाचा दावा केलाय.
महागठबंधन, पीकेंना पराभवाचा धक्का!
महागठबंधनला सध्या फक्त 35 जागांवर आघाडी मिळाल्याचे चित्र बिहारमध्ये पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत राहुल गांधींसह तेजस्वी यादव यांच्यासाठी देखील हा एक मोठा धक्का मानला जात आहे. संध्याकाळी अंतिम कल येतील, मात्र महागठबंधनला बिहारमध्ये जबरदस्त पराभवाचा झटका बसला आहे.
सद्यस्थितीनुसार, बिहार निवडणुकीत जन सुराजला एकही जागा न मिळाल्याने प्रशांत किशोर जे देशातील सर्वात यशस्वी निवडणूक रणनीतीकार समजले जातात त्यांच्या राजकीय प्रवासाला पहिल्याच क्षणी तगडा झटका बसला आहे. निवडणुकांपूर्वी तीन वर्षांचा कष्टसाध्य प्रवास, हजारो किलोमीटरची पदयात्रा, डिजिटल माध्यमांवरील प्रचंड लोकप्रियता आणि ‘बिहार बदलण्यासाठी तिसरा पर्याय’ उभा करण्याचा दावा या सर्व गोंगाटानंतरही निकालाने PK यांची निराशा झाली आहे.
लाडक्या बहिणींमुळे NDA ला यश ?
बिहारमध्ये देखील एनडीएने महिलांसाठी खास योजना आणत प्रत्येक महिलेच्या बॅंक खात्यावर 10 हजार रूपये जमा केले आणि याचाच मोठा फायदा एनडीएला बसला. महिलांनी भरभरून एनडीएला मतदान केले आणि थेट याचा मोठा फायदा झाला. निवडणुकीच्या दोन महिने आधी संवाद मोहीम सुरू झाली. तुमची योजना, तुमचे सरकार, तुमचे मत. तेजस्वीच्या “माझी बहीण” योजना त्या तुलनेत फिकी पडली. 10 हजार रूपये महिलांना देण्यात आल्याने महिलांनी मोठ्या संख्येने मतदान केले.











