Cloudflare down : जगभरात ट्विटर आणि चॅट जीपीटी बऱ्याच तासांपासून बंद, 75 लाख वेबसाईट्सवर परिणाम

ट्विटर आणि चॅट जीपीटीपासून अनेक वेबसाइटवर परिणाम झाला आहे, मात्र यामागील कारण काय आहे?

नवी दिल्ली – सोशल मीडिया म्हणून नव्या पिढीत ओळखल्या जाणाऱ्या चॅटबॉट, ट्विटर, एआय, कॅनव्हा सारख्या वेबसाइट्स गेल्या काही तासांपासून बंद आहेत. संध्याकाळी पाच वाजल्यापासून या सेवा बंद झाल्या आहेत.

केवळ भारतातच नाही तर जगभरातील युझर्सना लॉगिन, साईनअप, पोस्ट पाहण्यासाठीआणि प्रीमियम सेवा वापरण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतोय. सर्व्हर डाऊन झाल्याची माहिती देणारी डाऊन डिटेक्टर वेबसाईटही बंद आहे. सर्व्हर देणाऱ्या क्लाऊडफ्लेयर डाऊन असल्यामुळे या समस्यांचा सामना करावा लागतोय. याचा परिणाम याच्याशी संबंधित असलेल्या 75 लाख वेबसाईट्सवर झालेला आहे.

45 टक्क्यांहून जास्त सोशल मीडिया वापरणाऱ्यांना अडचणी

डाऊन डिटेक्टरनं दिलेल्या माहितीनुसार, जगभरात एक्स पोस्ट, वेब आणि अॅपमध्ये एक्सेस करणाऱ्या 45 टक्के ग्राहकांना पोस्ट रिफ्रेश करताना अडचणींचा सामना करावा लागतोय. इतरांना वेब कनेक्शन आणि वेबसाईटच्या अडचणी जाणवल्या आहेत.

क्लाऊडफ्लेयर हे एकमेव कारण

क्लाऊडफ्लेअर ही एक इंटरनेट इन्फ्रा पुरवणारी कंपनी आहे. यामुळे वेबसाईट आणि अॅप्लिकेशन जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह मानण्यात येतं. ही सेवा विस्कळीत झाल्यानं याचा परिणाम इतर ठिकाणी जाणवतोय.

क्लाऊडफ्लेयरकडून सांगण्यात आलंय की, या प्रकाराची चौकशी करण्यात येतेय. ही समस्या समजून घेण्याचा आणि त्यावर मात करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय, असंही स्पष्ट करण्यात आलंय. याबाबतचे अपडेट सातत्यानं देण्यात येतील हेही स्पष्ट आहे.

काय आहे क्लाऊडफ्लेयर?

इंटरनेट हे सर्वांसाठी खुलं आहे, अशा स्थितीत गुन्हेगारी, वाईट मानसिकता असणारेही या ठिकाणी आहेत. अशा स्थितीत चुकीचं ट्रॅफिक वेबसाईटवर येऊ नये यासाठी क्लाऊडफ्लेयरचा वापर करण्यात येतो. वेबसाईट गतिमान, सुरक्षित आणि विश्वासार्ह राहण्यासाठी याचा फायदा होतो. याच कारणासाठी वेबसाईट्स क्लाऊडफ्लेयरची सेवा घेतात.


About Author

Smita Gangurde

Other Latest News