MP Breaking News
Fri, Dec 19, 2025

Chhattisgarh Ulta Pani : इथं उटल्या दिशेने वाहतं पाणी, निसर्गाचा अद्भूत चमत्कार; विनोद तावडेंनीही दिली भेट

Written by:Smita Gangurde
Published:
छत्तीसगडमधील हे अद्भुत स्थळ "उल्टा पानी" या नावानं ओळखलं जातं. या भागाची भौगोलिक रचना आणि गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे पाणी उलट्या दिशेने वाहतंय, असं म्हटलं जातं.
Chhattisgarh Ulta Pani : इथं उटल्या दिशेने वाहतं पाणी, निसर्गाचा अद्भूत चमत्कार; विनोद तावडेंनीही दिली भेट

छत्तीसगडमध्ये उल्टा पानी नावाचं ठिकाण सध्या एकदम चर्चेत आलंय. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान आणि भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनीही या ठिकाणाला भेट दिलीय. शास्त्रज्ञांनी मात्र हा प्रकार आभास असल्याचं म्हटलंय. पाहूयात नेमका काय प्रकार आहे.

विनोद तावडेंनीही दिली उल्टा पानीला भेट…

डोंगरात कधी चढावर उलट जाणारं पाणी तुम्ही पाहिलं आहे का? तुमचा विश्वास बसणार नाही मात्र हे सत्य आहे. छत्तीसगडच्या अंबिकापुरजवळील मैनपाटमध्ये निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार पाहायला मिळतोय. पाणी नेहमी वरुन खालच्या दिशेने वाहतं, परंतु या ठिकाणी पाणी चढावर वाहताना पाहायला मिळतं. केंद्रीय कृषि मंत्री आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनीही या ठिकाणाला नुकतीच भेट दिली. कागदाच्या होड्या सोडून पाणी कोणत्या दिशेनं जातयं याची तपासणीही करण्यात आली. हा चमत्कार पाहून त्यांनीही आश्चर्य व्यक्त केलंय.

छत्तीसगडमधील उल्टा पानी काय आहे?

छत्तीसगडमधील हे अद्भुत स्थळ “उल्टा पानी” या नावानं ओळखलं जातं. या भागाची भौगोलिक रचना आणि गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे पाणी उलट्या दिशेने वाहतंय. शास्त्रज्ञांनी मात्र हा सगळा ऑप्टिकल इल्युजनचा प्रकार असल्याचं सांगत हा अभास असल्याचं मत व्यक्त केलंय. आता या पाण्याच्या उलट्या प्रवाहाच्या वैज्ञानिक कारणांचा उलगडा होण्याची गरज आहे. सध्या तरी हा परिसर पर्यटक आणि संशोधकांसाठी आकर्षणाचा विषय ठरतोय. त्यामुळं सरगुजा जिल्ह्यात या ठिकाणी पर्यटनासाठी गर्दी वाढू लागलीय. या चमत्काराच्या चर्चेमुळे अंबिकापुर आणि मैनपाट परिसरातील निसर्गसौंदर्याकडेही अनेकांचं लक्ष वेधलं जातंय.