Bihar Election Result: बिहार विधानसभा निवडणुकीची उद्या मतमोजणी; एनडीए की महागठबंधन, कोण जिंकणार?

अवघ्या देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचा उद्या निकाल लागणार आहे. उद्या सकाळी ठिक 7,00 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. एनडीए की महागठबंधन कोणाचं सरकार येणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार लावला. मतदान प्रक्रिया पार पडली असून आता प्रतिक्षा आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त निकालाची. उद्या बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल येणार असून पोल अगोदरच आली आहेत. बिहारमध्ये मतदानाचा एक नवीन विक्रम प्रस्थापित झाला. आता याचा फायदा कोणाला होणार हे चित्र उद्या स्पष्ट होईलच.

बिहार विधानसभा निवडणूक; उद्या मतमोजणी

उद्या बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल येणार असून एक्झिट पोल अगोदरच आली आहेत. पहिल्या टप्प्यात सुमारे 65 टक्के आणि दुसऱ्या टप्प्यात 69.90 टक्के मतदारांनी मतदान केले. सर्वांचे लक्ष आता उद्याच्या 14 नोव्हेंबर रोजी बिहारच्या 243 जागांसाठी मतमोजणी होणार आहे, याकडे आहे. कोणाचे नशीब उजाडते आणि कोणाच्या पदरी निराशा पडते, हे अवघ्या काही तासात कळेलच.

मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा सत्तेत येतील की माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सत्ता हाती घेईल हे उद्या स्पष्ट होईलच. सकाळी मतमोजणी सुरू होईल, त्यानंतर सुरुवातीचे कल समोर येऊ लागतील. दुपारपर्यंत बिहारमध्ये नेमकी कोणाची सत्ता हे स्पष्ट होईल. नितीश कुमार यांच्या बाजूनेच निकाल लागेल असे काही पोलमध्ये पुढे आलंय. जशी जशी निकालाची वेळ जवळ येतंय तशी लोकांमधील उत्सुकता वाढताना दिसत आहे.

एनडीए की महागठबंधन, कुणाचं सरकार ?

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांपूर्वी INDIA आघाडीने जोरदार दावा केला आहे. एक्झिट पोलचे अंदाज खोटे असल्याचे सांगत, १७० पेक्षा जास्त जागा जिंकून सरकार स्थापन करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. काँग्रेसनेही १४० जागा जिंकण्याचा दावा केला आहे. बदलासाठी जनतेने मतदान केल्याचे म्हटले आहे. मतमोजणीत दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.

मॅट्राइज-IANS च्या एक्झिट पोलनुसार, एनडीएला 147 ते 167 जागा, महागठबंधनाला 70 ते 90 जागा आणि इतरांना 2 ते 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे.यात भाजपला 65 ते 73 जागा, जेडीयूला 67 ते 75 जागा, एलजेपी (आर) ला 7 ते 0 जागा, ‘हम’ पक्षाला 4 ते 5 जागा आणि आरएलएमला 1 ते 2 जागा दिल्या गेल्यात.महागठबंधनमध्ये राष्ट्रीय जनता दल अर्थात ‘राजद’ला 53 ते 58 जागा, काँग्रेसला 10 ते 12 जागा, व्हीआयपीला 1 ते 4 जागा आणि डाव्या पक्षांना 9 ते 14 जागा मिळतील, असा अंदाज आहे.

या एक्झिट पोलनुसार, एनडीएला 48 टक्के, तर महागठबंधनाला 37 टक्के मते मिळू शकतात. चाणक्य स्ट्रॅटेजीजच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला 130 ते 138 जागा, महागठबंधनला 100 ते 108 जागा आणि इतरांना 3 ते 5 जागा मिळतील, असा अंदाज आहे. त्यामुळे एकूणच एक्झिट पोलनुसार बिहारमध्ये एनडीएचे सरकार बनण्याचे चित्र दिसत असले, तर महागठबंधनला विजयाचा विश्वास आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News