श्रीलंकेत ‘डिटवा’ चक्रीवादळाने मोठे नुकसान केले आहे. मृतांचा आकडा 50 पार गेला आहे. 25 जण बेपत्ता आहेत. चक्रीवादळामुळे श्रीलंकेत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. सर्व नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. देशातील सरकारी कार्यालयांना आज सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय शाळा बंद ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. कोलंबोमध्ये विमान उतरू शकत नसल्यास ते तिरुअनंतपुरम किंवा कोचीकडे वळवण्यात येईल, असे सरकारने म्हटले आहे. राष्ट्रीय उद्याने बंद करण्यात आली असून अनेक रस्ते खराब झाले आहेत. आज सकाळी 6 वाजल्यापासून सर्व रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
दक्षिणेतील राज्यांच्या किनारी भागाला धोका
तर दुसरीकडे भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहिती चक्रीवादळ दितवाहचे परिणाम भारतातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये जाणवतील. या वादळांमुळे दक्षिण भारतातील किनारपट्टीच्या भागात हवामानाची परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. गुरुवारी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या खोल दाबाच्या पट्ट्याचे तीव्रतेने रूपांतर होऊन ते चक्रीवादळ दितवाहमध्ये रूपांतरित झाले असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

‘डिटवा’ चक्रीवादळ तीव्र झाल्याने तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पुद्दुचेरीच्या किनारपट्टीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 4 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट आणि 6 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून चेन्नईतील जलाशयांमधून पाणी सोडण्यात आले आहे. रेड हिल्स, पूंडी आणि चेंबारामबक्कम जलाशयांमधून प्रति सेकंद 200 घनफूट पाणी सोडले जात आहे. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या मुख्यालयात पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला.
दक्षिणेत किनारी भागातील नागरिकांसाठी अलर्ट
चक्रीवादळ उत्तर तामिळनाडू, पुडुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि केरळच्या किनाऱ्यांकडे सरकत आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत या भागात अत्यंत तीव्र हवामानाचा अंदाज आहे. विभागाने किनारी भागातील मच्छिमारांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे दक्षिणेत किनारी भागातील नागरिकांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. रेड हिल्स, पूंडी आणि चेंबारामबक्कम जलाशयांमधून प्रति सेकंद 200 घनफूट पाणी सोडले जात आहे. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या मुख्यालयात पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. एकूणच पुढील काही तासांत परिस्थितीत बिघडण्याची शक्यता आहे.











