Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोटानंतर अमित शहांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले की….

दिल्ली पोलीस आयुक्त आणि विशेष शाखा प्रभारी  घटनास्थळावर  दाखल झाले आहेत. या संपूर्ण घटनेचा तपास (Delhi Red Fort Blast) सुरू असून लवकरच जनतेपुढे याबाबतची संपूर्ण माहिती दिली जाईल,

देशाची राजधानी दिल्ली आज एका भीषण स्फोटाने (Delhi Red Fort Blast) हादरली. दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एक वर संध्याकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी हा स्फोट झाला. यामध्ये आत्तापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला तर 24 हून अधिक जखमी आहेत. या स्फोटानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली असून राजधानी दिल्ली सह मुंबईला सुद्धा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशाला संबोधित करताना मोठी माहिती दिली.

काय म्हणाले अमित शहा (Delhi Red Fort Blast)

यावेळी अमित शहा म्हणाले, लाल किल्ल्याजवळील सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नलवर एक ह्युंडाइ आय-20 कारमध्ये रात्री 7 वाजता हा स्फोट झाला. या स्फोटामध्ये काही पादचारी प्रवासी जखमी झाले असून काही वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी आली आहेत. प्राथमिक माहितीनुसार या स्फोटात काही नागरिकांचा जीव गेला. या भीषण स्फोटाची माहिती मिळताच 10 मिनिटांत दिल्ली स्पेशल पोलीस पथक, दिल्ली क्राइम  ब्रांच ,घटनास्थळी  दाखल झाली.

संपूर्ण माहिती जनतेसमोर मांडली जाईल

NSG  आणि NIA च्या टीमनेही फॉरेन्सिक टीमसह  FSL स्फोटाचा तपास सुरु केला आहे. तसेच, परिसरातील सर्व CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. मी दिल्ली पोलीस आयुक्त आणि विशेष शाखा प्रभारी यांच्यशी फोनवरुन संवाद साधला. दिल्ली पोलीस आयुक्त आणि विशेष शाखा प्रभारी  घटनास्थळावर  दाखल झाले आहेत. या संपूर्ण घटनेचा तपास (Delhi Red Fort Blast) सुरू असून लवकरच जनतेपुढे याबाबतची संपूर्ण माहिती दिली जाईल, असे अमित शाह यांनी म्हटले.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News