MP Breaking News
Wed, Dec 17, 2025

50 वर्षे 2 रूपयांत रूग्णसेवा करणारा डॉक्टर हरपला; डॉक्टर ए.के.रायरू गोपाल नेमके कोण होते?

Written by:Rohit Shinde
Published:
तब्बल 50 वर्षे अवघ्या 2 रूपयांत रूग्णसेवा करणाऱ्या डॉ. ए. के. रैरू गोपाळ यांचे नुकतेच निधन झाले. ते केरळमध्ये रूग्णसेवा बजावत होते.
50 वर्षे 2 रूपयांत रूग्णसेवा करणारा डॉक्टर हरपला; डॉक्टर ए.के.रायरू गोपाल नेमके कोण होते?
सध्या काही खाजगी रुग्णालये आणि डॉक्टरांकडून रुग्णांची आर्थिक लूट ही गंभीर समस्या बनली आहे. किरकोळ आजारांसाठीही महागडी चाचणी, अनावश्यक औषधे, ICU मध्ये भरती करणे यामुळे सामान्य माणसांचे आर्थिक कंबरडे मोडते. अनेक वेळा डॉक्टरांच्या आणि औषध कंपन्यांच्या संगनमतामुळे रुग्णांना जास्त खर्च करावा लागतो. गरजूंपेक्षा नफ्यावर भर देणाऱ्या या प्रवृत्तीमुळे वैद्यकीय क्षेत्रावरील विश्वास डळमळीत होतो. अशा परिस्थितीत डॉ. ए. के. रैरू गोपाळ यांसारखे सेवाभावी डॉक्टर आदर्श ठरतात. वैद्यकीय सेवा ही व्यवसाय नसून सामाजिक जबाबदारी आहे, हे या लुटणाऱ्या पद्धतीमुळे पुन्हा ठसवले जाते. तब्बल 50 वर्षे अवघ्या 2 रूपयांत रूग्णसेवा करणाऱ्या डॉडॉ. ए. के. रैरू गोपाळ यांचे नुकतेच निधन झाले.

50 वर्षे 2 रूपयांत रूग्णसेवा

केरळच्या कन्नूर येथे आपल्या क्लिनिकमध्ये पाच दशकांपासून केवळ 2 रुपयांत रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर ए.के.रायरू गोपाल (80) यांचे वार्धक्याशी संबंधित आजाराने रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी आहे. ज्यांच्याकडे पैसे नसत त्या रुग्णांना हे डॉक्टर मोफत औषधही देत होते. त्यामुळेच, डॉ. गोपाल लक्ष्मी यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ होत असून मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी देखील दु:ख व्यक्त केलं आहे. गेल्या 2 पिढ्यांना वैद्यकीय सेवा अत्यल्प दरात पुरवणाऱ्या डॉक्टरांबद्दल आजही लोकांमध्ये आपलुकी, तितकाच आदर आहे. त्यामुळेच, अशा डॉक्टरांच्या निधनाचे वृत्त समजताच सर्वसामान्यांकडून आपल्याच घरातील कुणीतरी गमावल्याची भावना व्यक्त केली जाते.

कोण होते डॉक्टर गोपाळ लक्ष्मी?

डॉ. ए. के. रैरू गोपाळ (A. K. Rairu Gopal) हे केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील ‘Two‑Rupee Doctor’ म्हणून चर्चेत राहिले. त्यांनी पन्नाश वर्षांहून अधिक काळ गरीब रुग्णांना तुकडी फीवर सेवा दिली. “लक्ष्मी” नावाच्या त्यांच्या निवासी क्लिनिकमध्ये ते दररोज सकाळी ४ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सेवा देत. सुरुवातीला त्यांनी ₹2 आकारली, नंतर ती ₹ 10 इतकी वाढवली तरीही ही फी बाजारापेक्षा अत्यल्प होती.त्यांच्या सेवेतून अंदाजे 18 लाखांहून अधिक रुग्णांना लाभ झाला. केरळचे मुख्यमंत्री पिनाराय विजयन यांनी त्यांना “लोकांचा डॉक्टर” म्हणून वर्णन केले आहे; त्यांचे मरणोत्तर अंत्यसंस्कार पाय्यांबलम येथे झाले.