वॉशिंग्टन डीसी – अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलविन यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल़्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ट्रन्प हे देशापेक्षा जास्त स्वताचा फायदा करुन घेत असल्याची टीका त्यांनी केली आहे.
ट्रम्प यांचा वैयक्तिक पाकिस्तानसोबत असलेल्या कुटुंब व्यवसायामुळे ट्रम्प भारताशी संबंध खराब करत आहे, असंही सुलवीन म्हणाले आहेत.

नेमकं काय म्हणालेत सुलविन?
भारतासह इतर देशांवर जादा टेरिफ आकरण्याचा ट्रम्प यांचा निर्णय अयोग्य असल्याचं सलविन म्हणाले आहेत. त्यासोबतच ट्रम्प यांनी घेतलेल्या या निर्णयाचे दुष्परिणाम अमेरिकेला भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी ट्रम्प हे भारत आणि पाकिस्तानातील शस्त्रसंधीचं श्रेय घेत असल्याची टीकाही त्यांनी केलीय.
पाकिस्तानला खूश करण्याचा प्रयत्न
अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाशी फारकत घेत डोनाल्ड ट्रम्प हे पाकिस्तान आणि पाकचे लष्कर प्रमुख असिम मुनीर यांना खूश करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.
पाकशी सौहार्दपणाच्या वागणुकीची अपेक्षा
अमेरिकनं सातत्यानं भारताशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवलेले आहेत. भारताशी चांगले संबंध ठेवण्याची गरज असून त्यातून अमेरिकेला फायदा होऊ शकतो असंही मत त्यांनी व्यक्त केलंय.











