इंडोनेशियाचा जकार्तामध्ये कॉर्पोरेट ऑफिसच्या इमारतीला आग, २० जणांचा मृत्यू

इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये मंगळवारी दुपारी एका सात मजली ऑफिस इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर येत आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत किमान २० जणांचा मृत्यू झाला आहे.

इंडोनेशियाच्या जकार्तामध्ये मोठी दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. त्यामध्ये 7 मजली इमारतीला आग आगल्याने जवळपास 20 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आगीमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, जकार्तामध्ये 7 मजली इमारतीला आग लागली. यामध्ये ऑफिसेस होते.

नेमकी काय दुर्घटना घडली ?

इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये मंगळवारी दुपारी एका सात मजली ऑफिस इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर येत आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत किमान २० जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेसंबंधी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग इतक्या वेगाने पसरली की काही मिनिटांतच धुराने संपूर्ण परिसर व्यापला गेला. यामुळे ऑफिसच्या इमारतीतून बाहेर पडणे अत्यंत कठीण झाले होते. ही घटना जकार्ताच्या एका गजबजलेल्या व्यावसायिक परिसरात घडली. आग लागताच आजूबाजूचे लोक आणि कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ उडाला. आगीच्या उंच ज्वाळा आणि सतत निघणाऱ्या धुरामुळे बचावकार्य करणेही खूप अवघड झाले होते.

स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आग इमारतीच्या पहिल्या मजल्यावर लागली आणि काही क्षणातच संपूर्ण इमारतीमध्ये पसरली. दुर्घटनेच्या वेळी अनेक कर्मचारी जेवणाची सुट्टी सल्याने जेवण करत होते. अचानक लागलेल्या आगीमुळे वरच्या मजल्यांवर अडकलेल्या लोकांना तेथून बाहेर निघण्यास वेळ मिळालाच नाही.

मात्र आता आगीवर नियंत्रण मिळवलं गेलं असून जवळपास 20 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आगीमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. फायरफायटर्स बॉडी बॅग घेऊन जाताना दिसून येत आहेत. यामध्ये टेरा ड्रोन इंडोनेशियाचे अनेक कर्मचारी होते. ही कंपनी मायनिंगपासून शेतीपर्यंत सर्व क्षेत्रासाठी ड्रोन पुरवण्याचं काम करते. मात्र घटनेवर अद्याप या कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

हॉंगकॉंगमध्ये राहिवासी इमारतीला भीषण आग

दरम्यान या अगोदर 26 नोव्हेंबर रोजी हॉंगकॉंगमधील तैपे या ठिकाणी एकाच वेळी तब्बल सात इमारतींना आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. ज्यामध्ये तब्बल 44 लोकांचा मृत्यू झाला होता. याबाबत पोलिसांनी तीन संशयतांना अटक केली होती. बुधवारी 26 नोव्हेंबरच्या दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही आग लागण्याची घटना घडली. त्यानंतर साडेतीन वाजेपर्यंत तब्बल चार अलार्म फायर वाजले. जे हॉंगकॉंग मधील दुसरे मोठे अलार्म सांगितले जात आहेत. जे अत्यंत मोठी दुर्घटना झाल्यानंतर वाजतात.


About Author

Rohit Shinde

Other Latest News