नेपाळमध्ये Gen-Z पुन्हा रस्त्यावर, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रोष; 12 जिल्ह्यांत कर्फ्यू लागू

Rohit Shinde

नेपाळमध्ये Gen – Z पुन्हा एकदा रस्त्यावर आली आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की काही भागात कर्फ्यू लावण्यात आला आहे. विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. एकूणच नेपाळमधील परिस्थिती पुन्हा एकदा बिघडताना दिसत आहे.  नेपाळमध्ये जेन-झी आणि माजी सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांमध्ये पुन्हा एकदा संघर्ष सुरु झाला आहे. ज्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक ठिकाणी कर्फ्यू लावण्यात आला आहे.

नेपाळमध्ये पुन्हा एकदा तणावाचे वातावरण

भारताच्या शेजारील राष्ट्र नेपाळमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार भडकला असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, नेपाळमध्ये जेन-झी आणि माजी सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांमध्ये पुन्हा एकदा संघर्ष सुरु झाला आहे. ज्यामुळे तब्बल 12 जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. हिंसक संघर्षादरम्यान सहा पोलीस अधिकारी जखमी झाले आहे. ही स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे.

सुशिला कार्कींचे सर्वांना शांततेचे आवाहन

बुधवारी, बारा जिल्ह्यातील सिमरा भागात जेन झी निदर्शक आणि सीपीएन-यूएमएल कार्यकर्त्यांनी रॅली काढली तेव्हा परिस्थिती आणखी बिकट झाली. ज्यामुळे अधिकाऱ्यांना कर्फ्यू लागू करावा लागला. नेपाळ पोलिसांचे प्रवक्ते अबी नारायण काफले यांनी एएफपीला सांगितले की, परिस्थिती सामान्य आहे. कोणीही गंभीर जखमी झालेले नाही. दरम्यान, नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांनी शांततेचे आवाहन केले आणि सर्व पक्षांना 5 मार्च 2026 रोजी होणाऱ्या निवडणुकीपूर्वी अनावश्यक राजकीय चिथावणी टाळा आणि लोकशाही प्रक्रियेवर विश्वास ठेवा असे आवाहन केले.

नेपाळमध्ये सप्टेंबरमध्ये मोठा संघर्ष

8 आणि 9 सप्टेंबर रोजी नेपाळमध्ये झालेल्या निदर्शनांमध्ये किमान 76 लोकांचा मृत्यू झाला. हे निदर्शने सरकारने सोशल मीडियावर तात्पुरत्या बंदी घातल्याने झाली. सप्टेंबरमधील निदर्शने मागील सरकारच्या सोशल मीडिया बंदीमुळे झाली होती, परंतु आर्थिक मंदी आणि व्यापक भ्रष्टाचाराच्या वर्षानुवर्षे चाललेल्या निषेधामुळे संताप अधिकच तीव्र झाला आहे. निदर्शनांच्या दरम्यान, चार वेळा पंतप्रधान राहिलेले 73 वर्षीय ओली यांना पदावरून हटवण्यापूर्वी संसद, न्यायालये आणि सरकारी कार्यालये जाळण्यात आली.

ताज्या बातम्या