Goa Night Club Fire: गोव्यातील नाईट क्लब दुर्घटनेत 25 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती; जखमींवर उपचार सुरू

Rohit Shinde

गोव्यातील नाईट क्लबला लागलेल्या आगीमध्ये २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गोव्यातील अर्पोरा गावात मध्यरात्री ही आगीची घटना घडली आहे. शनिवारची रात्र ही नाईटक्लबमधील २५ लोकांसाठी शेवटची रात्र असेल असा विचारही कोणी केला नसेल, लोक नाईट क्लबमध्ये मजा करण्यासाठी आले होते, पण त्यांच्यावर अचानक काळाने घाला घातला. शनिवारी रात्री उशिरा उत्तर गोव्यातील अर्पोरा परिसरातील एका नाईट क्लबमध्ये सिलिंडरचा स्फोट झाला. सिलेंडर स्फोटानंतर लागलेल्या आगीत पंचवीस जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बळी पडलेल्यांमध्ये बहुतेक गोवा नाईट क्लबमधील कर्मचारी होते. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

२५ जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार

गोव्यातील अरपोरा येथील एका नाइट क्लबमध्ये शनिवारी मध्यरात्रीनंतर गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या दुर्घटनेत किमान 25 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती अधिकृत पातळीवर देण्यात आली आहे. मृतांमध्ये क्लबमधील स्वयंपाकघरातील बहुसंख्य कर्मचारी असून त्यात तीन महिला आणि काही पर्यटकांचाही समावेश आहे. घटनेच्या वेळी क्लबमध्ये मोठी गर्दी होती. आग अचानक पसरल्याने अनेकांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. काही जणांचा मृत्यू जळून तर इतरांचा मृत्यू धुरामुळे श्वास गुदमरल्याने झाला.

या हृदयद्रावक घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, उत्तर गोव्यात घडलेल्या या भीषण दुर्घटनेत अनेकांचे प्राण गेले हे अत्यंत वेदनादायी आहे. शोकाकुल कुटुंबीयांना त्यांनी मनःपूर्वक संवेदना व्यक्त केल्या आणि जखमींच्या लवकरात लवकर प्रकृतीत सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना केली.

नाईट क्लबमध्ये नेमकं काय घडलं?

या घटनेबाबत सुरुवातीच्या तपासात असे दिसून आले आहे की, बहुतेक मृत्यू भाजल्यामुळे झाले नाहीत तर गुदमरल्यामुळे झाले आहेत. २५ मृतांपैकी चार पर्यटक होते, तर उर्वरित हॉटेल कर्मचारी होते. हा नाईट क्लब उत्तर गोव्यातील अर्पोरा येथील रोमियो लेनजवळील बर्च येथे आहे. २५ जणांपैकी २० जणांचा मृत्यू फक्त गुदमरून झाला आहे. तपासात असे दिसून आले की फक्त दोघांचा मृत्यू भाजल्यामुळे झाला, तर उर्वरित २३ जणांचा मृत्यू फक्त गुदमरून झाला. जर त्यांनी ही एक चूक केली नसती तर या २३ जणांचे जीव वाचवता आले असते.

२३ जणांचा मृत्यू गुदमरून झाला, तर दोन मृतदेह जळालेले आढळले. याचा अर्थ असा की फक्त तीन जणांचा जळून मृत्यू झाला; इतरांचा मृत्यू धुराच्या श्वासोच्छवासामुळे झाला. गोवा पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रात्री १ वाजण्याच्या सुमारास नाईटक्लबच्या स्वयंपाकघराजवळ गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने हा अपघात झाला. स्फोट इतका मोठा होता की काही सेकंदातच आग संपूर्ण इमारतीत पसरली.

ताज्या बातम्या