GST Rate Cut For Cars : मुंबई- जीएसटीच्या स्लॅबमध्ये झालेल्या बदलांमुळे सर्वसामान्यांचं कार घेण्याचं स्वप्नसुद्धा कमी पैशात पूर्ण होणार आहे. कारण या बदलांमुळे बजेट फ्रेण्डली गाड्या स्वस्त होणार आहेत. तर श्रीमंताच्या लग्झरी कार महागणार आहेत.
कुठली वाहनं आता होणार स्वस्त?
१. पेट्रोल,एलपीजी, सीएनजी हायब्रिड कार
(1200 सीसी, 4,000 मिमीपर्यंत)

जीएसटी आधी 28 आता 18 टक्के
२. डिझेल हायब्रिड कार
(1500 सीसी, 4000 मिमीपर्यंत)
जीएसटी आधी 28 आता 18 टक्के
३. तीन चाकी वाहनं
जीएसटी आधी 28 आता 18 टक्के
४. मोटरसायकल
(350 सीसीपर्यंत)
जीएसटी आधी 28 आता 18 टक्के
५. मालवाहू मोटर वाहनं
जीएसटी आधी 28 आता 18 टक्के
दसरा दिवाळीत करा नव्या गाडीचं प्लॅनिंग
सर्वसामान्यांच्या गाड्या अर्थातच बजेट फ्रेंडली कॅटेगरीतल्या गाड्या या स्वस्त होतायत, त्याही दसरा-दिवाळी सारख्या सणांच्या अगदी काही दिवस आधी. 22 सप्टेंबरपासून जीएसटीचे हे नवे स्लॅब लागू होणार आहेत. त्यामुळे अर्थातच सर्वसामान्यांकडून कार खरेदी वाढेल अशी अपेक्षा आहे.
याचा फायदा सर्वसामान्यांना होईल, तसाच तो या कार बनवणाऱ्या कंपन्यांनाही होईल, असा अंदाज आहे. मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयाने सर्वसामान्यांच्या विचारातली गाडी प्रत्यक्षात रस्त्यावर धावायला वेग मिळेल. तर दुसरीकडे अगदी अलिकडेच ज्यांनी गाडी खरेदी केलीय.. खिशावर २८ टक्क्यांचा जीएसटीचा भार सहन केलाय, त्यांची मात्र काहीशी निराशा होणार आहे. शिवाय ज्यांचं लग्झरी गाडीचं स्वप्न रंगवलं असेल, त्यांना जरा जास्तच भुर्दंड बसणार आहे.
मोठ्या गाड्या महागात पडणार
ज्या कार आणि एसयूव्ही या चार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या आहेत, ज्यांची इंजिन क्षमता जास्त आहे. ज्या कारमध्ये प्रीमियम फीचर्स आहेत, अशा कारवर नव्या जीएसटी स्लॅबमध्ये 40 टक्के कर आकरण्यात येणार आहे. त्यामुळे श्रीमतांच्या कार या सगळ्यात अधिक महागणार आहेत. मात्र हा 40 टक्के कर 22 सप्टेंबरपासून लागू होणार नाही. तर हा कर लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकार घेणार आहे. त्यामुळे ज्यांना लक्झरी कार घ्यायचा विचार आहे, त्यांनी त्या कार आत्ता लगेच बुक केल्या तर त्या कारवर त्यांना आत्ताचा 28 टक्के जीएसटीच द्याा लागण्याची शक्यता आहे.











