MP Breaking News
Thu, Dec 18, 2025

Raksha Bandhan 2025 Wishes : ‘दादा, तुला कधीच अंतर देणार नाही’, रक्षाबंधनाच्या लाडक्या भावा-बहि‍णींना लाखमोलाच्या शुभेच्छा

Written by:Smita Gangurde
Published:
Last Updated:
कधी मैत्रिण तर कधी आई होऊन काळजी घेणारी बहीण पाहिली की भावांना मोठा आधार वाटतो. या कडू-गोड नात्याचा खास दिवस म्हणजे रक्षाबंधन.
Raksha Bandhan 2025 Wishes : ‘दादा, तुला कधीच अंतर देणार नाही’, रक्षाबंधनाच्या लाडक्या भावा-बहि‍णींना लाखमोलाच्या शुभेच्छा

भावा-बहिणीचं नातं खास असतं. यात रुसवे-फुगवे असतात, भांडण असतं, कधी कधी तर मारामारी पण असते, पण तरीही या नात्यात वेगळाच ओलावा असतो. आता एकमेकांना टाकून बोलणारे भाऊ-बहीण पुढच्याच क्षणाला एकमेकांवरुन जीव ओवाळून टाकताना तुम्ही पाहिलं असेल. कधी मैत्रिण तर कधी आई होऊन काळजी घेणारी बहीण पाहिली की भावांना मोठा आधार वाटतो.

या कडू-गोड नात्याचा खास दिवस म्हणजे रक्षाबंधन. बहिणीच्या सुरक्षेची जबाबदारी घेतलेल्या भावाला आज बहिणींनी प्रेमाने ओवाळा. त्याला गोडधोड खाऊ घाला. याबदल्यात भावाने आपल्या बहिणीला काहीतरी खास द्यायला हवं. हा सण आनंदात साजरा करा. त्यापूर्वी आपल्या लाडक्या भावाला आणि बहिणीला दोन शब्द प्रेमाचे पाठवा. नात्यातील गोडवा अधिक वाढेल.

रक्षाबंधनाच्या जीवापाड शुभेच्छा…(Raksha Bandhan 2025 Best Wishes In Marathi)

1 एक नातं जिथं भांडणं असतं, पण प्रेम अजून जास्त असतं…
जिथं लहानपण असतं, पण जबाबदारीही असते…
त्या भावंडांच्या प्रेमाचा सण…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

2 राखीचा सुगंध दरवळला,
भाव-बहिणीचं नातं फुललं.
नात्यातल्या या प्रेमासाठी,
शुभेच्छांचा वर्षाव झाला!

३ कुठल्याच नात्यात नसेल
एवढी ओढ आहे,
म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं,
खूप खूप गोड आहे…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

4 एक धागा, एक विश्वास,
हा सण प्रत्येक भावाबहिणीसाठी खास
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

5 मला सुपरहिरोची काहीच गरज नाही
कारण माझ्याजवळ माझा मोठा भाऊ आहे
दादा, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

भावाकडून बहिणीला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा…(Raksha Bandhan 2025 Special Messages In Marathi)

१ तू माझं नशीब आहेस,
तुझं हासणं हेच माझं सौख्य आहे.
राखीच्या निमित्ताने सांगतो –
बहिणी, तुझ्यावर खूप प्रेम करतो! शुभ रक्षाबंधन!

2 तुझं माझं नातं म्हणजे टॉम अँड जेरी
जेवढा राग, तेवढंच प्रेम
हे म्हणजे लय भारी

ताई, रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

3 मोठा भाऊ असणं ही प्रत्येकासाठी भाग्याची गोष्ट आहे,
कारण तो तुमच्यावर वडिलकीच्या नात्याने धाक तर दाखवतोच,
पण वाईट गोष्टींपासून तुमचं रक्षणही करतो!
बहिणी मी आहे तू काळजी करू नकोस…

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

4 रक्षाबंधनाची वाट बहीण पाहते सुंदर सुंदर गिफ्ट्ससाठी
भावाला आतुरता हातावर राखी बांधण्याची
दोघांमधील हे नाते असते मधुर
म्हणूनच राखीसाठी दोघेही असतात आतुर
रक्षाबंधनाच्या लाख शुभेच्छा !

5 तुझे माझे जमेना तुझ्यावाचून करमेना
असेच नाते असते भावा बहिणींचे
कितीही भांडले दोघे तरी वीण नात्यातील तुटेना
राखीपौर्णिमेच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !